उजनी बॅकवॉटर परिसरात वॉटर स्पोर्टसाठी 100 कोटीचा निधी मंजुर ; बोट सफारीसह इतर सुविधा उपलब्ध होणार
करमाळा समाचार
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात पर्यटनाला चालना देण्यासाठी या धरणाच्या बॅकवॉटर परिसरात वॉटर स्पोर्ट विकसित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतीच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आराखडा दाखवला असुन याठिकाणी पायाभूत सुविधांसाठी 100 कोटींची प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे.

धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यात जलक्रीडाद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात जागा पहिल्या टप्प्यात उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात प्रकल्पाची व्याप्ती निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही भागात पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून प्रकल्पाचा आढावा घेतला जाईल. प्राथमिक टप्प्यात उजनीच्या बँक वॉटर परिसरात कोणत्या प्रकारचे जलक्रीडा करता येईल, याची माहिती पर्यटन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

जलक्रीडेची ठिकाणे निश्चित करताना करमाळा तालुक्याला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. कारण पुणे राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देणे अधिक सोयीचे आहे. त्या दृष्टीने त्याच परिसरात जलक्रीडा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषत: ज्या भागात दलदल नाही, स्वच्छ पाणी आणि आसपासची काळी माती नाही अशा भागांना प्राधान्य दिले जाईल. त्याची मदत घेऊन पुनरावलोकन केले जाईल. यानंतर असे खेळ देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी माहिती संकलित करण्यात येत आहे. तीन महिन्यांत नियोजित बॅक वॉटर एरियामध्ये जलक्रीडा उभारण्याचा हा प्रस्ताव अत्यंत प्राथमिक अवस्थेत असला तरी येत्या तीन महिन्यांत सविस्तर आराखडा तयार करून शासनाला सादर केला जाणार आहे.
100 कोटींची मान्यता ..
उजनी धरण परिसरात जल पर्यटन विकसित करण्यासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. तो शुक्रवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर करण्यात आला. या प्रकल्पासाठी 150 ते 200 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. उजनी जलाशयात जलक्रीडा उभारण्यात येणार असून पायाभूत सुविधांसाठी 100 कोटींची प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर आराखडा बनवण्याचे काम 20 जूनपासून सुरू होणार आहे. 30 जुलैपर्यंत अंतिम आराखडा तयार होईल. 15 ऑगस्टला तो पुन्हा सादर केला जाईल. शासनाच्या मान्यतेनंतर कामाला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
उजनीत बोट सफारी, क्रुझ सफारीचा आनंद घेता येईल…
उजनी धरण निसर्गरम्य आणि पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. येथे वॉटर स्पोर्ट्स विकसित करता येते. उजनीचे पात्र वॉटर स्पोर्ट किलोमीटर लांबीचे आहे. याशिवाय धरण राष्ट्रीय महामार्गास जोडलेले आहे. पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी पाटबंधारे विभागाची जमीन उपलब्ध आहे. येथे जगातील सर्वात मोठा जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात आला आहे. या ठिकाणी तिकीट केंद्र, प्रतीक्षालय, मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, सभागृह, बोर्ड रूम,, रॉक पूल, वॉटर फ्रंट डेक, लाइट हाऊस, बोट रॅम्प, मरिना बोट पार्किंग, वॉटर स्पोर्ट्स, फ्लाईंग वॉटर बोर्ड, बोट सफारी, क्रुझ सफारीचा आनंद घेता येणार आहे.