करमाळासोलापूर जिल्हा

वसुंधरेचे संवर्धन ही सर्वांची सामाजिक जबाबदारी- अनिल बनसोडे प्रशासन अधिकारी

करमाळा समाचार

साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नंबर 1, नगर परिषद करमाळा या शाळेत माझी वसुंधरा अभियानांतर्गत करमाळा शहर वसुंधरा महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात करमाळा न. प. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे साहेब म्हणाले की जीवसृष्टीचे आणि पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन किंवा प्रदूषण नियंत्रण ही केवळ कायद्याच्या माध्यमातून शासनाने नियंत्रित करण्याची बाब राहिलेली नाही तर निसर्ग आणि मानव यातील नाते संबंध समजून घेऊन समाजातील विविध घटक, संस्था यांनी सकारात्मक भूमिकेतून एकत्र येऊन वसुंधरेचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी बनली आहे.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहा दिवस चाललेल्या या माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत करमाळा शहर महोत्सव अंतर्गत सर्व शाळांमधून हरित शपथ,वृक्षारोपण, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे, कापडी पिशवी तयार करणे,सायकल रॅली,रेन हार्वेस्टिंग, पर्यावरणपुरक मातीच्या वस्तू बनवणे, ई-बाईक, सौर ऊर्जा वापर असे विविध प्रकारचे उपक्रम राबवून शालेय विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती केली.

या महोत्सवात शिक्षण मंडळांतर्गत असणाऱ्या 14 प्राथमिक व माध्यमिक शाळांतील 5000 हजार विद्यार्थी 350 शिक्षक सर्व अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक व पालक, यशकल्याणी सेवाभावी संस्था व इतर संस्था यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून माझी वसुंधरा अभियान यशस्वीपणे राबवले. यामध्ये उत्कृष्ट कापडी पिशव्या टाकाऊ पासून टिकाऊ, मातीच्या वस्तू बनवलेल्या व आपल्या घरी,bपरिसरात झाडे लावलेल्या पर्यावरण दूत विद्यार्थ्यांचा,तसेच सावली प्रतिष्ठानचे सदस्य पर्यावरणप्रेमी भालचंद्र निमगिरे सर यांचे प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी बालाजी लोंढे साहेब, नगरसेवक अतुल फंड,मुख्याध्यापक दयानंद चौधरी सर,लिपिक शिवदास कोकाटे व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका संध्या शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमेश नामदे यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकला टांगडे,सुवर्णा वेळापुरे,सुनिता क्षिरसागर,मोनिका चौधरी,तृप्ती बेडकूते,निलेश धर्माधिकारी,भाग्यश्री पिसे या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE