करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

एस टी बाबतच्या उत्तराने प्रवाशांच्या जखमेवर मीठ ; कागदोपत्री सर्वकाही अलबेल ?

करमाळा समाचार 

विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वतीने सदर प्रश्नाला लेखी उत्तर आले आहे. यामध्ये बसची दुरुस्ती वेळोवेळी करण्यात येते तर आयुर्मान पूर्ण झालेली वाहने मोडीत काढलेली आहेत. त्यामुळे नव्या बस तर दिल्या जाणार नाही शिवाय आहे त्या ठिकाणी बसेस व्यवस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुळातच रोजच्या चार ते पाच बसेस रस्त्यात मध्येच बंद पडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेले या उत्तराने करमाळा तालुका व परिसरातील प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे.

मागील सात ते आठ महिन्यांपासून दररोज करमाळा तालुक्यातील आगारातील बस कायम कुठे ना कुठे बंद अवस्थेत मिळून येतात. यासंदर्भात तालुक्यातील युवकांच्या वतीने बसेसची माहिती समाज माध्यमातून टाकून सदरच्या अडचण ही चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात स्थानिक पुढारी तसेच आमदार, माजी आमदार व विविध पदाधिकाऱ्यांनी आवाजही उठवला होता. कायम चर्चेत असलेल्या या विषयाला सुरू असलेल्या अधिवेशनात प्रश्नाच्या माध्यमातून विचारण्यात आल्यानंतर मात्र असे काही घडतच नाही अशा प्रकारचे उत्तर मिळाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

politics

समाज माध्यमासह वर्तमानपत्र व टीव्ही चॅनल वर कायम बंद पडणाऱ्या गाड्यांच्या बातम्या ही प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या आधारे आ. रणजीतसिंह मोहिते यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करीत तालुक्याला मिळालेल्या बसेसबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यामध्ये तालुक्यात ६५ बस उपलब्ध आहेत. त्यातही मोठ्या प्रमाणावर बंद पडत असल्याने प्रवाशांना अडचणीच्या सामना करावा लागत आहे. त्या बस बदलल्या जातील का ? असा प्रश्न उपस्थित केला होता. शिवाय महाराष्ट्राच्या ताफ्यात नवीन बसेस बाबत व ई बसेस संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबाबतही लेखी उत्तर मिळालेले आहे.

विचारलेले प्रश्न…
करमाळा हे सोलापूर, पुणे, अहमदनगर, धाराशिव या जिल्ह्याच्या मध्यवर्ती बस स्थानक आहे येथून एसटीच्या २५० पेक्षा अधिक फेऱ्या होत असतात. सध्या करमाळा आगारात १०० बसची आवश्यकता असताना केवळ ६५ बस कार्यरत असून त्यातील बहुतांश बस ना दुरुस्त आहेत. गेल्या दहा वर्षापासून करमाळा आगाराला एकही नवीन बस मिळाली नाही. राज्यातील विविध आगारात वापरून झालेल्या बस या ठिकाणी देण्यात आलेल्या असल्याने त्या प्रवासादरम्यान रस्त्यावर बंद पडत आहेत. याचा नाहक त्रास प्रवाशांना होत आहे, हे खरे आहे का ? तसेच तालुक्यातील बसेस दुरुस्ती अभावी रस्त्यात बंद पडत असलेल्या घटना याचा गांभीर्याने विचार करून नवीन बस या आगाराला किती दिवसात उपलब्ध करून देणार ? असे प्रश्न उपस्थित केले होते.

आलेले उत्तर …
राज्य परिवहन करमाळा आगारात पुरेशा ६८ तसेच रा. प. कळमनुरी आगारात ३७ नियतांद्वारे वाहतूक केली जाते. तसेच वाहनांची स्थिती उत्तम ठेवण्याकरता नियतकालिक कार्यक्रमानुसार वाहनांची नियतकालिक देखभाल व आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येते. त्याचप्रमाणे आयुर्मान पूर्ण झालेली वाहने मोडीत काढण्यात आलेले आहेत. यामुळे बस बंद पडतात का ? या प्रश्नावर मात्र नाही उत्तर आल्याने नव्या बस येण्याच्या मार्गाला खोडा लागु शकतो. बऱ्याच दिवसापासून बंद बसची अडचण असताना स्थानिक अधिकारी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहीती पुरवतात का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE