करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मोटारसायकल चोरुन नेताना एकाला पोलिसांनी पकडले ; गुन्हा दाखल

करमाळा समाचार

करमाळा तालुका हद्दीत एका मोटरसायकल चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरचा संशयीत हा मोटरसायकल घेऊन जात असताना गस्त घालत असलेल्या पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर घोंगडे व पोलीस नाईक ठेंगल यांनी साडे परिसरात सदरची कारवाई केली आहे.

9 जुलै रोजी पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर घोंगडे व पोलीस नाईक ठेंगल हे करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे साडे येथे गस्त घालत होते. यावेळी रस्त्यावरून एक बिगर नंबरची मोटरसायकल त्यांना आढळली. त्यावेळी त्यांनी संबंधिताकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

यावरून त्याच्यावरील संशय बळावला त्याला विश्वासात घेऊन त्याचे नाव विचारले तर त्यांनी अंकुश साहेबराव काळे वय 30 रा. डोमगाव ता. परांडा जिल्हा धाराशिव असे सांगितले. नंतर त्याच्याकडे सदर मोटरसायकलचे कागदपत्र बाबत विचारणा केली त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे मोटर सायकल चोरीची असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यावरून त्यास अटक करीत त्याकडून बिगर नंबरची हिरो होंडा प्लस ही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE