करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

तालुक्यातील जनता आता बदल करण्याच्या मानसिकतेत

करमाळा समाचार

तालुक्यातील जनता आता बदल करण्याच्या मानसिकतेत आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक मध्ये केलेली कामे जनता विसरलेली नाही. यामुळे आता विकास काळ परत एकदा यावा म्हणून सन २०२४ ची विधानसभा निवडणूक जनता हातात घेणार आहे. तर कामोणे तलावात पाणी आणण्याची धमक केवळ नारायण आबा पाटील यांच्यातच आहे. शेतकऱ्यांनी सत्ता परिवर्तनास तयार रहावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल यांनी केले. माजी आमदार नारायण पाटील यांच्या जनसंवाद गावाभेट दौऱ्यात कामोने येथील कॉर्नर बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.

यावेळी माजी आमदार नारायण पाटील, पंचायत समितीचे उपसभापती दत्ताकाका सरडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर या बैठकीसाठी पंकज नलावडे, अरुण काळे, सुहास जाधव, बाळू शिंदे, चिंटू भालेराव, विकास कांबळे, औदुंबर नलावडे, सचिन नलावडे, अतुल नलावडे, बिभीषण देमुंडे, दत्तात्रय खरात, मारुती भिसे, नारायण शिंदे, अशोक चोरगे, बाळासाहेब देवकाते, सुदाम नलावडे, विठ्ठल भिसे, प्रशांत शिंदे, पोपट पवार, प्रकाश खराडे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

politics

यावेळी बोलताना देवानंद बागल म्हणाले की, नारायण आबा पाटील यांना आमदार करण्यासाठी आमचा रावगाव गट आघाडी वर असेल. कामोने, बिटरगाव श्री, पुनवर, आळजापूर, वडगाव उत्तर, खडकी आदी गावातून आज शेतकरी शेती साठी कायमस्वरूपी पाण्याची अपेक्षा माजी आमदार नारायण आबा यांचे समोर बोलून दाखवत होते. यामुळे भविष्यात या भागाला बागायत बनवण्यासाठी आता सत्तेत बदल निश्चित होणार आहे. लोकसभा तो झाकी थी, विधानसभा अभी बाकी है असेही देवानंद बागल यांनी ठामपणे सांगितले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE