विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद
करमाळा समाचार
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जम्मू काश्मीर येथील निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र व हरियाणा सारख्या राज्यात तारीख घोषित केली जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या पत्रकार परिषदेत जम्मु काश्मीर व हरियाणाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जातेय. या दोन राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाऊ शकतात. कलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीर खोऱ्यामध्ये पहिल्यांदाच निवडणूक पार पडणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील निवडणुक जाहीर केली जातेय का याकडे लक्ष लागले आहे.

पुढे ढकलण्याची कारण ..
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणार यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब होईल. ज्या राज्यांमध्ये निवडणूक अपेक्षित आहे त्यात हरियाणा झारखंड महाराष्ट्र जम्मू काश्मीर चा समावेश आहे. पण आज महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होणार नाही अशी माहिती मिळत आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 28 नोव्हेंबर पर्यंत आहे. दिवाळी 1 ते 3 नोव्हेंबर च्या दरम्यान आहे. कदाचित दिवाळीनंतर महाराष्ट्रात मतदान होण्याची शक्यता पण असु शकते.