करमाळाकृषीताज्या घडामोडीसकारात्मकसोलापूर जिल्हासोलापूर शहर

परिसरात कोरडवाहू क्षेत्र घटल्याने शेलगावात केळी संशोधनाची गरज ; शेतकरी आग्रही

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात उजनी जलाशयाचे क्षेत्र उपलब्ध झाल्यापासून तसेच दहिगाव योजना व मांगीतलावातील पाणी, शिवाय सीना नदीला पाणी आल्यानंतर बराचसा भाग हा बागायत क्षेत्र म्हणून गणला जाऊ लागला आहे. त्यामुळे या परिसरात असलेले कोरडवाहू संशोधन केंद्र हे विनाकारण जागा आटवून असल्याने त्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र स्थापन करावे ही मागणी जोर धरू लागली आहे. नुकताच या प्रश्न विधान भवनात प्रश्न उपस्थित केला असता त्याला कृषी मंत्रालयाच्या वतीने योग्य उत्तर न मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

करमाळा तालुक्यात एकूण एक लाख २८ हजार हेक्टर शेत जमीन ही लागवडीखाली येते. यामध्ये सुरुवातीला २२ टक्के शेतजमीन ही बागायत होती तर उजनी जलाशय व इतर केंद्र उपलब्ध झाल्यानंतर आता हेच क्षेत्र ६०% पर्यंत गेले आहे. त्यामुळे जवळपास चाळीस हजार क्षेत्र हे बागायती क्षेत्र म्हणून गणले जाऊ लागले आहे. विशेष म्हणजे ज्या भागात कोरडवाहू संशोधन केंद्र आहे. त्या भागात जवळपास ९० टक्के जमीन बागायत क्षेत्र झाले आहे. त्यामुळे सदरचे केंद्र बंद करून त्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र उभे रहावे अशी मागणी जोर धरत आहे.

तालुक्यात सध्याच्या परिस्थितीला उसाचे ३६ हजार हेक्टर तर केळीचे ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. यासाठी जवळपास एक कोटी पेक्षा जास्त केळीच्या झाडांची लागवड केली जाते. परंतु जिल्ह्यात अशा प्रकारचे संशोधन केंद्र कुठेही नसल्याने तालुक्यात जागा उपलब्ध करून सदर संशोधन केंद्र उभा केल्यास स्थानिकांसह जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही याचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे प्रशिक्षण केंद्र, टिशू कल्चर लॅबसह संशोधन केंद्र उभारावे लागणार आहे असे केल्यास शेतकऱ्यांना याचा नक्कीच लाभ होताना दिसेल.

शेलगाव येथील कृषी संशोधन केंद्र हे १९४१ साली आस्तित्वात आले. सिंचनाच्या सुविधा त्या काळात करमाळासह सोलापुर जिल्ह्यात नव्हत्या. संपूर्ण शेती कोरडवाहूच होती. म्हणून तत्कालीन गरजेप्रमाणे त्यावेळी कोरडवाहु शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र असले तरी आजची परस्थिती बदलेली आहे, उजनी धरणाच्या निर्मिती नंतर सोलापुर, पुणे,;नगर या तीनही जिल्ह्यातील हजारो एकर शेती सिंचनाखाली आली आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतीचे क्षेत्र कमालीचे घटले असून नगदी पिके घेण्याकडे शेतकरी वळाला आहे. त्यामधे केळी, ऊस या पीकांची लागवड हजारो एकरावर घेतले जात आहे. शेलगाव (वां) ता.करमाळा येथील हे केंद्र चोहोबाजूने केळी पीकाने वेढले असून एक गुंठा ही शेती कोरडवाहू नाही. करमाळा सह संपूर्ण सोलापुर जिल्ह्यात निर्यात क्षम केळी उत्पादीत केली जातेय . परंतु रोग नियंत्रण, पाणी वापर,जमीन, खते , रोपे ,आदि बाबी वर संशोधन व प्रशिक्षणाची गरज असल्याने हे केंद्र येथेच होणे गरजेचे आहे.
शिवाजीराव बंडगर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समीती, करमाळा.

मा. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले उत्तर हे जुन्या अहवालानुसार असुन तालुक्यात केळी संशोधन केंद्राची गरज आहे. त्याप्रमाणे आपण पुन्हा संबंधित विभागासोबत बैठक लावण्यासंदर्भात श्री. मुंडे यांच्याशी चर्चा करणार आहोत. मुळातच जो अहवाल होता तो ७० टक्के सकारात्मक होता हे आपण बैठकीत पटऊन देऊ व केंद्र तालुक्यात करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
आ. संजयमामा शिंदे, करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE