करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विधानसभा डोळ्यासमोर ठेवत पडद्यामागे हालचाली वाढल्या ; बागलांना खिंडित गाठण्याचा प्रयत्न

करमाळा समाचार 

तालुक्यातील मकाई व आदिनाथ दोन प्रमुख कारखाने व त्यामध्ये असलेल्या अडचणी यामुळे कायमच बागल यांना टार्गेट करण्यात आले. त्यामुळे सदरची कारखाने अडचणीतून बाहेर काढणे बागलांसमोर एक आव्हान आहे. ते करत असताना बागलांनी सर्व पर्याय व्यवस्थित हाताळत आतापर्यंत मकाई मधील थकीत देणे देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दोन्ही कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण आता हेच कारखाने उमेदवारीच्या मध्ये आणले जातील त्यामुळे निर्णय घेण्यावरुन बागलांसमोर धर्मसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गटाला अच्छे दिन आल्याचे दिसून आले. कारखान्यांसह तालुक्यातील इतर रखडलेली कामे व त्याचा पाठपुरावा करण्यात रश्मी बागल व दिग्विजय बागल हे दिसून येत आहेत. तर पुन्हा एकदा बागल गट स्थिर होताना दिसत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांनी विधानसभा लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तर बागल गटाला पूर्वपदावर येण्यासाठी व तालुक्यात ताकद टिकून ठेवण्यासाठी निवडणुका लढणे गरजेचेच आहे.

politics

बागल सध्या महायुतीमध्ये आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागल हेच भाजपाकडून दावेदार असतील अशा चर्चांना उदानही आले आहे. याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट या मित्र पक्षामध्ये तुल्यबळ असे नाव समोर येत नाही. त्यामुळे बागल यांचं या ठिकाणी वजन महत्त्वाचं ठरत आहे. विद्यमान आमदार संजयमामा शिंदे हे स्वतः अजित दादा यांना नेता मानतात आणि महायुतीतून लढवल्याचे ठरवल्यास किंवा पाठिंबा मिळवून घेण्याचे ठरवले तर ही संधी त्यांना मिळू शकते. पण त्यांची भुमिका सध्या गुलदस्त्यात आहे.

अशा परिस्थितीत बागल कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागणार आहे. तर कारखान्यांना सहकार्य करणार असल्याचे कारण देत बागलांना बाजूला केले जाऊ शकते. त्यामुळे कारखान्यात वाचवण्याच्या प्रयत्नात बागल गटाने आपला संपूर्ण गट व्हेंटिलेटर वर ठेवावा लागू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा उभारी घेतलेला गट व त्यातील कार्यकर्ते तग धरून राहतील का ? पक्ष बागल यांना कोणता आदेश देतोय व बागल त्याचं पालन करणार का ? या सर्व गोष्टी विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहेत. पण सध्या पडद्यामागे जोरदार हालचाली चालू असल्याचे दिसत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE