करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अपेक्षा गोरक्षकांकडुन पण पुर्ण करीत आहेत पोलिस ; पो. नि. गुंजवटे यांचा पुढाकार

करमाळा समाचार

कत्तलखान्याकडे घेऊन जात असलेल्या गोवंशांना सोडवण्यात गोरक्षकांना यश आले होते. त्यांच्या कौतुक ही तालुका भर झाले जिल्हा बर बातम्या फिरल्या. पण सोडवण्यात आलेल्या त्या कोवळ्या खोडांबद्दल पुढे काय झाले. याबद्दल कोणालाच काही देणं घेणं नसावं असंच सध्या चित्र दिसून येत आहे. सदर प्रकरणातील 50 जर्सी गाईची खोंड हे गो शाळेत नेऊन सोडली. पण त्यांच्या खाण्यापिण्याचे काय हा प्रश्न कोणालाच पडला नाही हे विशेष.

मुळात कारवाई करून गुन्हेगारांना पकडून पोलिसांचं काम संपलेलं होतं. पण तरीही पोलिसांनी त्या खोंडांकडे दुर्लक्ष केले नाही. करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी स्वतःहून गोशाळेत जाऊन संबंधित गौवंशांना लहान असल्यामुळे दुसरे काही खाता येत नाही. त्यामुळे फक्त दुधाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी जाऊन स्वतः बॉटल ने दूध पाजले आहे व दोन दिवसांपासून ही प्रक्रिया पोलीस नित्यनियमाने करीत आहेत. मुळात पोलिसांचे हे काम नाही तरीही ते करत असल्याने त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे.

या कामात इतर पोलिस कर्मचारी कोणतीही तक्रार न करता आपल्या साहेबांसोबत जुडले आहेत. कामाचा ताण व इतर वाढीव कामे असतानाही वेळात वेळ काढुन इतर कर्मचारी त्या गोवंशांना अन्न पुरवठा करीत आहेत. या कामात गुंजवटे यांच्यासह हवालदार विलास रणदिवे, अजित उबाळे, पोलिस नाईक चंद्रकांत ढवळे, तौफिक काझी व गणेश शिंदे आदि सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. पोलिस हे काम करत असले तरी ही माहीती देण्यास ते उत्सुक नव्हते. आम्हाला ज्यावेळी माहीत झाले त्यावेळी आवर्जुन याबाबत वृत्त प्रसिद्ध केले. मुळात हीच अपेक्षा गोरक्षक व गोप्रेमीकडुन आहे. शक्य असेल त्यांनी एक गोवंश सांभाळायला घेऊन गेले पाहिजे. किंवा त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

ताब्यातील तिघांना चार दिवस पोलिस कोठडी …
सोमवारी गोवंश कत्तलखान्याकडे घेऊन जात असताना ताब्यात घेतलेल्या तिघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिरोज वाहीद कुरेशी (वय २४) रा. अकलूज ता. माळशिरस, रफिक जमखंडी (वय २८) ता. गोकाक जि. बेळगाव राज्य कर्नाटक सध्या स्टार बेकरी अकलूज व रशीद इस्माईल बेपारी (वय ४५) रा. कासार पट्टा, इंदापूर जि पुणे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE