करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आंब्याच्या व्यापाऱ्याकडुन सावडीच्या शेळकेंची दहा लाखांची फसवणुक ; करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा समाचार 

मुंबईच्या आंब्याच्या व्यापाऱ्यांकडून सावडी येथील सतीश शेळके यांची दहा लाखांची फसवणूक झाल्या प्रकरणी करमाळा पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात एप्रिल महिन्यामध्ये आंब्याच्या बागेतून आंबे घेऊन गेले तरी ठरलेल्या रकमेतील दहा लाख रुपये आज तागायत दिले नाहीत व पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावडी तालुका करमाळा येथे सतीश शेळके यांच्या चार एकर शेत जमिनीत आंब्याची बाग आहे. या ठिकाणी एका सहकाऱ्याच्या मध्यस्थीने मुंबईचे व्यापारी आले होते. त्यांच्यासोबत 14 लाख 50 हजार रुपये असा व्यवहार ठरला. टप्प्याटप्प्याने पैसे व माल घेऊन जात असताना शेळके यांचा विश्वास त्यांनी संपादित केला. सुरुवातीच्या दोन टप्प्यांमध्ये साडेचार लाख रुपये अकाउंट वर आले व शेवटच्या फेरीतील सर्व फळे तोडून घेऊन गेल्यानंतर दहा लाख रुपये शिल्लक असताना अकाउंटचे कारण सांगत विश्वासात घेऊन नंतर देतो असे सांगितले. त्यावर शेळके यांचा विश्वास बसला.

politics

तेव्हापासून आजतागायत शेळके यांनी संबंधितांकडे पैशाची मागणी केली असता संशयित आरोपींनी पैसे देण्याची टाळाटाळ सुरू केली. यावरून शेळके यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 1) फरीद अहमद अब्दुल हक शेख, 2) मकसुद फरीद शेख, 3) मेहमुद फरीद अहमद शेख, 4) सारीफ फरीद अहमद शेख सर्व रा गणेश मंदिराजवळ, वीर जिजाबाई भोसले मार्ग, इंदीरानगर, गल्ली नंबर 3, मानखुर्द मुंबई असे त्या चौघांचे नाव आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE