करमाळासोलापूर जिल्हा

वीज बीलावरुन आंदोलन तापले ; अतुल खुपसेच्या नेतृत्वाखाली शेतकरी करमाळ्याकडे रवाना

करमाळा समाचार 

विज बिल भरण्यावरून करमाळ्यात वातावरण तापले असताना आता आतून खूपसे यांनी या आंदोलनात लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच पारेवाडी सब स्टेशन येथे पाचशे ते सातशे शेतकऱ्यांनी घेराव घातला होता. यावेळी उपस्थित पोलिसांनी सर्वांना गेटच्या बाहेर काढत आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न केला.

तर अतुल खूपसे यांनी सर्व शेतकऱ्यांना घेऊन आता आपला मोर्चा थेट करमाळा तहसील कडे वळवला आहे. त्या ठिकाणी तहसीलदार यांच्याशी चर्चा करून पुढील मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता आहे.

सध्या शेती पिक विजेअभावी जळण्याचे शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शनिवार रविवार तसेच सोमवार मंगळवार बँका बंद असल्याने शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. कारखान्यांनी उसाची बिले दिले नाहीत. त्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. लोकडाऊन च्या काळात शेतीमालावर पडलेला प्रभाव व पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार या भीतीने उद्योग व्यवसाय वर झालेला परिणाम हा दिसून येत आहे.

त्यातच महावितरणच्या वतीने जबरदस्तीने वसुली केली जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असून त्यामुळे शेतकरी संतापला आहे. त्यामुळेच आज पारेवाडी सब स्टेशन येथे परिसरातील सातशे ते आठशे शेतकऱ्यांनी उपकेंद्राला घेराव घातला. यावेळी पोलिसांनी सर्व शेतकऱ्यांना हुसकावून लावत गेटच्या बाहेर काढले.

तर त्या ठिकाणी आलेले शेतकरी नेते अतुल खूपसे यांनी सर्व शेतकऱ्यांना घेऊन करमाळा तहसीलदार यांच्याकडे आपला मोर्चा वळवला असून त्याठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडून वीज घेऊनच माघारी जाऊ असा पवित्रा घेतल्याने सर्व शेतकरी सध्या मोटरसायकलवर करमाळ्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते करमाळा येथे पोहोचतील.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE