करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

भिलारवाडीत आई व मुलीचा खुन ; संशयीत आरोपी फरार तपास सुरु

करमाळा समाचार

भिलारवाडी तालुका करमाळा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. एका घरात एक महिला व मुलगी मृतावस्थेत मिळाले आहे. तर महिलेचा पती हा कुठेतरी निघून गेला आहे. त्यामुळे दोघांचा खून करून पती फरार झाल्याची संशय व्यक्त केला जात आहे. सदरचा प्रकार हा रात्री घडला असून सकाळी एकाने करमाळा पोलिसांना कळविल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस जाऊन तपास घेत आहेत. याप्रकरणी तपासासाठी तीन पथके रवाना केल्याची माहीती पोलिस निरिक्षक श्री सुर्यकांत कोकणे यांनी दिली आहे.

भिलारवाडी येथील लक्ष्मी अण्णासाहेब माने व तिची 14 वर्षाची मुलगी दोघेही भिलारवाडी त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत मिळून आले आहेत. त्यांना रात्रीतच कोणत्यातरी हत्याराने मारून जखमी करून खून केला आहे. दोघीही पहाटेपर्यंत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. यावेळी त्या ठिकाणी नातेवाईकांनी पाहिल्यानंतर दोघीही मृत झाल्याचे दिसून आले.

परिसरात लक्ष्मी यांचे पती अण्णासाहेब हे मिळून न आल्याने दोघींचा खून करून ते निघून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नेमकं कोणत्या कारणांनी व खून केल्यानंतर ते कुठे गेले त्याचा तपास पोलीस घेत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE