खुन प्रकरणात फरार संशयीत करमाळा पोलिसांच्या जाळ्यात ; एका महिलेसह चौघे ताब्यात
करमाळा समाचार
सततचा वाद, शेती व जुन्या भाडणातुन शेलगाव ता. करमाळा येथील एकाचा धारदार शस्त्राने खुन करण्यात आला होता. दरम्यान फिर्यादीच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऋतिक उर्फ गद्या काळ्या भोसले (वय २०) या व्यक्तीचा खुन करण्यात आला आहे. तर सावत्र भावासह ६ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात एका महिलेसह चौघांना करमाळा पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी किरण उर्फ इरण्या अप्रिशा भोसले, धर्मेंद उर्फ गंडया अप्रिशा भोसले, लकेश धर्मेंद्र भोसले, पालेखान अप्रिशा भोसले, पाटलीन अप्रिशा भोसले सर्व रा. शेलगाव वांगी, ता. करमाळा, जि. सोलापुर, इशा म्हरलाल काळे रा. वडारवाडी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत.
शेलगाव वांगी येथे दि २ रोजी दुपारी २ ते २:३० वा चे सुमारास जुन्या भांडणाचे कारणावरून सहा लोकांनी एकत्रीत येवुन शेतीचे व जुना भांडणाचे कारणावरून मयत मुलास डोकीत, पोटावर, गालावर, कानावर धारदार हत्याराने मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले अशी तक्रार आहे. याप्रकरणी मिथाला काळ्या भोसले (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. सदर घटनेचा तपास पोलिस निरिक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक संदेश चंदनशिव व पोलीस नाईक मनीष पवार, पोलीस नाईक वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर घोंगडे, सोमनाथ जगताप, गणेश शिंदे
गुन्हे प्रकटीकरण विभागातील कर्मचारी करीत आहेत.