video – मनोहर भोसले करमाळा पोलिसांच्या ताब्यात ; बारामती येथुन पथक रवाना
करमाळा समाचार
महिलेवर आत्याचार प्रकरणात गुन्हा नोंद असलेला मनोहर भोसले यास आज बारामती पोलिसांच्या ताब्यातून करमाळा पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. करमाळ्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वाखाली पथक सकाळी रवाना झाले आहे. सायंकाळपर्यंत ते पथक भोसले यांना घेउन करमाळ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.


बारामती येथे भोसले यांच्यासह तीन जणावर गुन्हा दाखल झाला होता. यातील सुरुवातीला मनोहर भोसले यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या दोन साथीदार तसेच इतर अधिक माहितीसाठी सुरुवातीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती. त्यानंतर पोलिस कोठडी वाढवत तीन दिवसाची मिळाली होती.
करमाळ्यात ही एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याबाबत अटक करून त्यांना करमाळा पोलिस ठाण्यात आणले जाणार आहे.
दरम्यान याच घटनेतील दुसरा आरोपी ओंकार शिंदे याला तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याला आज तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. शशिकांत खरात या तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात जादुटोणा प्रतिबंधक कायद्याखाली भोसल ओंकार शिंदे व विशाल वाघमारे या दोघांवरही गुन्हा दाखल आहे त्यापैकी ओंकार शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात आला.