आध्यात्मिककरमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

श्रीदेवीचामाळ येथे कमलादेवी भव्य मिरवणूक छबिना यात्रा १५ नोव्हेंबर पासून सुरुवात

करमाळा

श्री कमलादेवी यात्रा महोत्सव श्रीदेवीचामाळ येथे कमलादेवी भव्य मिरवणूक छबिना यात्रा १५ नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे. तसेच शनिवारी सात डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता कुस्त्यांच्या आखाड्याचंही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजेराव रंभा तरुण मंडळ तसेच कमलादेवी यात्रा समिती यांच्या वतीने देण्यात आली आहे.

सालाबाद प्रमाणे करमाळा तालुक्यातील कुलदैवत श्री कमलाभवानी जगदंबा अष्टभुजा देवीचा कार्तिक उत्सव यात्रा कार्यक्रम व लोकवर्गणीतून होणारा इतर सर्व उत्सव त्यामध्ये कमला भवानी भव्य मिरवणूक छबिना पाच दिवस  वेगवेगळ्या वाहनावरती मिरवणूक काढण्यात येते.

त्यामध्ये १५ नोव्हेंबर रोजी दुपारी गरुड, रात्री सिंह, १६ नोव्हेंबर दुपारी छोटा नंदी, रात्री मोठा नंदी, १७ नोव्हेंबर दुपारी काळवीट, रात्री घोडा, १८ नोव्हेंबर दुपारी मोर, रात्री लहान हत्ती, १९ नोव्हेंबर सप्तमुखी घोडा, पाच वाहन, मोठा हत्ती, रात्री अकरा वाजून ५५ मिनिटांनी मुख्ययात्रा काढण्यात येते.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE