करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची कारवाई ; करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा समाचार

विधानसभा निवडणूक २०२४ चे पार्श्वभूमीवर करमाळा पोलीस ठाणेची रेकॉर्डवरील २ पेक्षा जास्त गुन्हे दाख्ल असलेल्या शरीराविषयी तसेच इतर गुन्हयातील ११ आरोपीवर हददपारीचे प्रस्ताव तयार करुन मा. उपविभागीय दंडाधिकारी साो. माढा विभाग, कुर्डुवाडी यांचेकडे सादर केलेले आहेत.

निवडणूकीचे काळात कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होवू नये याकरीता शरीराविषयी गुन्हे असलेले, अवैध धंदे करणारे तसेच मागील निवडणुकीचे संदर्भात ज्यांचेवर गुन्हे दाखल आहेत. अशा १०२ आरोपीवर निवडणुकीचे काळात तात्पुरत्या स्वरूपात हददपारीचे प्रस्ताव तयार करुन मा. उपविभागीय दंडाधिकारी साो. माढा विभाग, कुडुवाडी यांचेकडे सादर केलेले आहेत.

politics

अवैद दारू धंदे करणारे ज्या आरोपीवर दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा ३२ आरोपीवर माहाराष्ट्र दारूबंदी अधि. कलम ९३ प्रमाणे प्रस्ताव तयार करुन मा. उपविभागीय दंडाधिकारी साो. माढा विभाग, कुर्दुवाडी यांचेकडे सादर केलेले आहेत. तसेच निवडणुकीचे अनुषंगाने ६४ दारूबंदी चे गुन्हे दाखल करण्यात अलेली आहे.

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १२९ प्रमाणे १२ आरोपीवर प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव मा. अपर पोलीस अधिक्षक साो. सोलापूर ग्रामीण यांचेकडे पाठवून आरोपीकडून चांगले वर्तुनुकीचा बॉन्ड घेण्यात आलेला आहे. शरीराविषयी व इतर गुन्हे दाखल असलेले ४४९ आरोपींवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १२६ प्रमाणे प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव मा. तहसिलदार, करमाळा यांचेकडे सादर करुन त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणूक २०२४ चे पार्श्वभूमीवर अशाच प्रकारची कारवाई चालु राहील. त्यामळे निवडणुक कालावधीमध्ये सर्व नागरीकांनी शांतता राखुन कायदा व सुव्यवस्था राखणेकामी सहकार्य करावे. कायदा मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

सदरची कारवाई ही मा. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, मा. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री. अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग, करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी विनोद घुगे, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे व करमाळा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE