E-Paperकरमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पवार आणि नारायणआबा पाटील यांना भटक्या विमुक्त जमाती संघटनेचा पाठिंबा

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रामकृष्ण मानेभाऊ यांनी दिले पाठिंबा पत्र

करमाळा ( जि. सोलापूर) – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष उपराकार मा. लक्ष्मणराव माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. त्या अनुषंगाने करमाळा (जि. सोलापूर) आणि कर्जत – जामखेड (अहिल्यादेवीनगर) या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष करमाळा येथील असणारे मा. रामकृष्ण माने भाऊ यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर भटके विमुक्त जमाती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा. रामकृष्ण माने भाऊ (करमाळा) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत – जामखेड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आ. रोहितदादा पवार आणि करमाळा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार नारायणआबा पाटील यांना पाठिंबा पत्र दिलेले आहे.

कर्जत – जामखेड आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातील वंचित, उपेक्षित, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती – जमाती संवर्गातील नागरिकांच्या विकासासाठी महाविकास आघाडी कायम कार्य तत्पर राहील. अशी अपेक्षा बाळगून सदर पाठिंबा रामकृष्ण माने भाऊ यांनी जाहीर केला. यावेळी उमेदवार आ. रोहितदादा पवार आणि नारायण आबा पाटील यांनी भटके विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष उपराकार मा. लक्ष्मणराव माने, उपाध्यक्ष मा. रामकृष्ण माने भाऊ तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

politics

याप्रसंगी बोलताना रामकृष्ण माने भाऊ यांनी, भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष उपराकार लक्ष्मणराव माने साहेब हे गेली 50 वर्षे राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत काम करत आहेत. पवार साहेबांनी नेहमीच संघटनेला सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य केलेले आहे. या पार्श्वभूमीवरच पवार साहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा पवार साहेबांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगानेच प्रतिगामी शक्तींचा पराभव करण्यासाठी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहोत. असे सांगितले.

यावेळी कर्जत – जामखेड विधानसभा मतदार संघातून उमेदवार आ. रोहितदादा पवार आणि करमाळा विधानसभा मतदारसंघांमधून मा. नारायण आबा पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्यासाठी मतदारसंघातील भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या सदस्यांनी, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावे. असे आवाहन मा. रामकृष्ण माने भाऊ यांनी केले. यावेळी ऍड. संग्रामदादा माने, युवा नेते सुनीलबापू सावंत, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, दत्ताभाऊ सरडे तसेच भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE