करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सावडीच्या बुलेट चोराला करमाळा पोलिसांकडुन अटक

करमाळा समाचार 

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी मोटारसायकल चोरीतील आरोपीस अटक करुन ५०,०००/- रु किंमतीचा मुददेमाल आरोपीकडून हस्तगत केला आहे. १५ सप्टेबर रोजी रात्रीच्या सुमारास सचिन विलास माने वय २८ वषे, रा. गुलमोहर वाडी ता. करमाळा, जि सोलापुर यांचे राहते घरासमोर मौजे गुलमोहरवाडी येथुन काळया कलरची रॉयल इनफिलट कंपनीची बुलेट चोरीला गेली होती. सुरज जनार्धन तळेकर, (वय २२) रा. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापूर असे पकडलेल्या संशयीताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, दि १५ रोजी रात्री ९ ते सकाळी सात च्या दरम्यान गुलमोहर वाडी येथुन रहात्या घरापासुन (एम.एच.१२ एम.ई.७८३२) ही कोणीतरी सदर गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी लागलीच पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना देवून सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंघाने रवाना केले. सदर गुन्हयाचे तपासादम्यान सदर गुन्हयातील संशयीत आरोपी हे गुन्हयातील चोरीस गेलेली मोटारसायकल विक्रीसाठी घेवून जाणार असल्याची गोपनीय माहीती मिळाल्याने कोर्टी ते जिंती जाणारे रोडवर रस्त्याचे कडेला पोलिस थांबले असता काही वेळातच एका मोटारसायकल वरुन एक इसम जात असल्याचे दिसले.

politics

सदर मोटारसायकल पोलीसांनी रस्त्याला थांबवीली असता गाडीवरील दोन इसम गाडी रस्त्यावर टाकून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीसांनी त्याला जागीच पकडले सदर इसमाकडे पोलीसांनी त्यांचे ताब्यातील मोटारसायकल चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्यावेळी पोलीसांनी त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर मोटारसायकल गुलमोहरवाडी ता. करमाळा येथील एका घराचे समोरुन चोरी करुन आणल्याचे सांगीतले. त्यामुळे सदर आरोपी व मुददेमाल ताब्यात घेवून पोलीसांनी आरोपीस सदर गुन्हयात अटक केली असून, सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ ठेंबरे हे करत आहेत. सदरची कारवाई पोलिस निरिक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाने केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE