त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब च्या गोरक्ष नाथा लोंढेची भोपळ येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर इन्व्हर्सिटी मल्लखांब स्पर्धेसाठी निवड
करमाळा
कुर्डुवाडी येथे पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी, सोलापूर के. एन.भिसे कॉलेज भोसरे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर युनिव्हर्सिटी इंटर युनिव्हर्सिटी मल्लखांब निवड चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेतुन त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळाचा गोरक्ष नाथा लोंढे मुलांच्या मल्लखांब स्पर्धेत मध्ये घवघवित यश संपादन करत रौप्य पदक मिळवले. या स्पर्धेत सोलापूर युनिव्हर्सिटी मधून विविध कॉलेज मधून सहभाग नोंदवला होता. या निवड चाचणीत दैदिमान कामगिरी करत रौप्य पदक पटकवले. तसेच अभिजित भोसले सर-पुणे, सतीश जाधव सर ( ठाणे ), शिवछत्रपती पुरस्कार विजेते -मल्लखांब-ऋषिकेश अरणकल्ले ( पुणे शहर पोलीस ) यांची विजयी खेळाडुला वेळोवेळी मल्लखांब यां खेळाचे मार्गदर्शन लाभले.
तसेंच गोरक्ष लोंढे चे अभिनंदन त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळा चे सचिवा सौ – निशा लखन शिरस्कर, तसेंच श्री-लखन शिरस्कर ( पुणे ग्रामीण पोलीस-शिक्रापूर ) व अतुल शिरस्कर (SRPF पोलीस-दौंड ) यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व क्लब चे आधारस्तंभ श्री-ललित शिंदे ( करमाळा पोलीस स्टेशन ) करमाळा चे पत्रकार विशाल घोलप यांनी पुढील होणाऱ्या ऑल इंडिया इंटर इन्व्हर्सिटी भोपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विजयी खेळाडूंनच्या या यशामागे त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळा चे मुख्य प्रशिक्षक सागर शिरस्कर ( सर ) यांचे रोज मोलाचे मार्गदर्शन लाभते . तसेच क्लब चे जुनिअर कोच, कु-साक्षी खुळे, कु-संयुक्ता सोनके, कु-आदिती चांदगुडे, कु- मछिंद्र लोंढे यांचे तालुका क्रीडा संकुल करमाळा येथे रोज संध्याकाळी 3, 4 तास सराव घेण्यात मोलाचे सहकार्य लाभते. स्पर्धेदरम्यानकरमाळा शहर मधील नामवंत क्रीडा शिक्षक श्री -सचिन दळवे सर, प्राध्यापक-रामकुमार काळे सर, श्री-जितेश कांबळे सर, श्री-अंकुश थोरात सर तसेंच त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळा च्या सर्व पालक वर्ग, हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वरील विजयी मल्लखांब खेळाडूंचे विविध स्तरावरून करमाळा शहर, ग्रामीण मधून तसेंच तालुक्यातुन अभिनंदन होतं आहे व शुभेच्छा मिळत आहेत. विशेष म्हणजे करमाळा तालुक्यातुन फक्त गोरक्ष लोंढे याची निवड झाली आहे.