करमाळासोलापूर जिल्हा

शाळा पूर्व तयारी मेळावा :- पालक- शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्तेस दिशादर्शक ठरेल- बालाजी लोंढे

करमाळा समाचार


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सन 2023-2024 या नवीन शैक्षणिक वर्षात संपूर्ण राज्यात इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या दाखल पात्र विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी मेळावा अंतर्गत विद्यार्थ्यांचे पाहिले पाऊल हा उपक्रम राबविला जात आहे.

न.प.शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी माननीय अनिल बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कै.साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं.१,नगर परिषद करमाळा या शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.नवागत( दाखल पात्र) विद्यार्थ्यांनींचे व त्यांच्या पालकांचे मान्यवरांच्या व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत गुलाबपुष्प, फुगे, गोळ्या, चॉकलेट देऊन स्वागत व अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा.बालाजी लोंढे यांनी केले.आपल्या उद्घाटनपर भाषणात लोंढे साहेब म्हणाले की शाळा पूर्व तयारी मेळावा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शाररिक,भावनिक,मानसिक,बौद्धिक,सामाजिक स्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने पालक व शिक्षकांना नक्कीच दिशादर्शक ठरेल. विद्यार्थ्यांची सर्वांगीण स्थिती तपासण्यासाठी शाळेने 1ते 7 क्रमांकाचे टेबल उपक्रम, कृतीनिहाय ठेवले होते त्यामध्ये पालकांना त्यांच्या मुलींच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस प्रेरणा देणारा अंतराळवीर मी कल्पना चावला होणार हा सेल्फी पॉइंट लक्षवेधी ठरला.

उपस्थित पालकांच्या वतीने सौ.माधुरी पवार मॅडम यांनी शाळेविषयी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की या शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाविषयी, शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमाविषयी सोशल मीडियातून पाहिलं,ऐकलं आहे पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज माझ्या मुलीचा प्रवेश घेतना सर्वच मुलींच्या उज्ज्वल भविष्याच्या शिक्षणातील पाहिले पाऊलांचे स्वागत शाळेने अतिशय उत्साहात,आकर्षक आनंददायी कार्यक्रम घेवून केले आहे नक्कीच या शाळेतून बाहेर पडणाऱ्या मुली विविध क्षेत्रात उंच भरारी घेतील याची खात्री आम्हा सर्व पालकांना झाली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी मा.बालाजी लोंढे साहेब होते तर प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मा.सचिन काळे,रवींद्र उकिरडे,विक्रम आल्हाट होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दयानंद चौधरी सर यांनी केले सूत्र संचालन श्रीमती संध्या शिंदे मॅडम केले तर उपस्थित मान्यवर व पालकांचे आभार श्री.रमेश नामदे सर मानले.कार्यक्रमास नवीन प्रवेशित मुलींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.चंद्रकला टांगडे मॅडम,सुवर्णा वेळापूरे मॅडम,सुनिता क्षीरसागर मॅडम,मोनिका चौधरी मॅडम,तृप्ती बेडकुते मॅडम, भाग्यश्री पिसे मॅडम,श्री.भालचंद्र निमगिरे सर,निलेश धर्माधिकारी सर, यांनी परिश्रम घेतले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE