करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात बसस्थानक व मेनरोडवर चोरी ; दोन प्रकरणात तीघींवर गुन्हा एकीला अटक

करमाळा समाचाऱ

शहरातील वेगवेगळ्या घटनेत महिलांकडुन चोरीचे प्रकार करण्यात आले आहेत. एक प्रकारे करमाळ्यात महिला चोरांची टोळी सक्रिय असल्याचे दिसुन येत आहे. एका प्रकरणातील आरोपी महिलेला पकडले तर दुसऱ्या घटनेतील महिला पळुन गेली आहे. तीने दिड तोळे वजनाचा मुद्देमाल घेऊन पळाली आहे. पहिली घटना बसस्थानकावर तर दुसरी मुख्य रस्त्यावर डीएच सिंधी दुकान परिसरात दि २० रोजी घडली आहे.

पहिल्या प्रकरणात सुभद्रा कानगुडे, वय ७५, रा. देवळाली ता. करमाळा जि.सोलापूर यांनी तक्रार दिली तर यातील चोरीत सोनाली सागर सकट रा.भारत नगर तांडा कलबुर्गी ता. कलबुर्गी जि. शहाबादवाडी राज्य कर्नाटक हीस अटक केली आहे. याबाबत अधिक माहीती की, आज दि. २० रोजी दुपारी २:१५ वा. चे सुमारास करमाळा एस.टी. स्टॅन्ड येथे एस. टी. बसमध्ये चढण्या करीता रांगेत असताना सोनाली हीने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे अर्धा तोळा मनि मंगळसुत्र व एक तोळा गंठन गर्दीचा फायदा घेवुन ओढुन तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केला तीस पकडण्यात यश आले आहे.

politics

तर दुसऱ्या घटनेत मनिषा श्रीनाथ जाधव वय २५ रा. सिध्दटेक ता. कर्जत जिल्हा अहमदनगर ही आपल्या गावाकडे लग्न कार्यासाठी आली होती. शहरात खरेदीसाठी फिरत असताना दि २० रोजी दुपारी १२ वा सुमारास अनोळखी दोन महिलां हातचलाखीने गर्दिचा फायदा घेवुन तीच्या पर्स मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिनेची रोख रकम असलेले पाकिट चोरुन नेले आहे त्यामध्ये दिड तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, पाऊन तोळा कानातले टॉप, दिड ग्रम वजनाचे लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याची पेठी, चार सोन्याचे मणी, २ हजार रोख रक्कम असे एकुण दिड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. दोन्ही घटनेचा पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE