बस स्थानकात चोरी करुन पळुन जाताना तीन महिलांना पकडले
करमाळा समाचार
शहरात वारंवार चोरीच्या घटना घडत असताना आज दुपारी बस स्थानक येथे एक असाच चोरीचा प्रकार घडला. तात्काळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी परिसरात संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात जाऊन विचारपूस केली असता संबंधित महिला संशयित आरोप यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

करमाळा येथील बस स्थानकात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. म्हणून या ठिकाणी करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी बंदोबस्त ठेवलेला होता. परिसरात आज चोरीची घटना घडताना त्या ठिकाणी कालवा होऊ लागला व स्थानिकांनीही संशयित महिलांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांना संपर्क साधून त्या महिलांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी पोलीस पथक या ठिकाणी पोहोचले यामध्ये अमोल रंदिल, रविराज गटकुळ, योगेश येवले व मेजर आनंद पवार यासह महिला कॉन्स्टेबल वरवडे यांचा समावेश होता. यांनी तात्काळ त्या महिलांना ताब्यात घेतले व करमाळा पोलीस ठाणे या ठिकाणी घेऊन नेले.

यावेळी त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच संशयित चोर महिला बोलू लागल्या व त्यांनी सदरचे मनी मंगळसूत्र कुठे टाकले आहे याची माहिती दिली. त्यावरून त्या ठिकाणी जाऊन मंगळसूत्र ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे चोरीस गेलेला मुद्देमाल मिळुन आला सदरच्या चोरी घडल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात चोर ताब्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पुढील प्रक्रिया सुरु आहे.