करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

नाशीकचे वारकऱ्यांचे विठ्ठल दर्शन अधुरे ; सतरा जखमी एक उपचारा दरम्यान मयत

करमाळा समाचार

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असताना त्यांच्या पिकअप गाडीला समोरून येत असलेल्या दुसऱ्या पिकअप गाडीने समोरासमोर धडक दिल्याने १७ जण जखमी झाले आहेत. त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील चार ते पाच जणांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात पाठवण्याचे काम सुरू होते. सदरचा अपघात सायंकाळी पाच वाजून ४७ मिनिटांनी करमाळा अहिल्यानगर मार्गावर जातेगाव रस्त्यावर घडला आहे.यात निलाबाई पांडुरंग चकोर वय ५५ यांचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे.

करमाळा तालुक्यातील वांगी भागातील एक पिकअप अहिल्यानगरच्या दिशेने जात होती. तर सदरचे वारकरी हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले होते. समोरून येत असलेल्या एका गाडीला चुकवुन दुसऱ्या गाडीला समोरासमोर ठोकर लागल्याने सदर गाडीतील वारकरी अपघातात जखमी झाले आहेत. हा अपघात इतका गंभीर होता की गाडीचा समोरील भाग चकाचूर झाला आहे. तर धडकेने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन पडली आहे. यावेळी स्थानिकांनी ११२ क्रमांक वरती फोन करून पोलिसांना व ॲम्बुलन्स ला बोलावून घेतले.

politics

या ठिकाणी तात्काळ चार ॲम्बुलन्स पोहोचल्या व त्यामध्ये सर्व रुग्णांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी काहींच्या हाताला तर काहींच्या पायाला तसेच डोक्याला, छातीला मार लागल्याने त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. यावेळी एक वयोवृद्ध आजीला आती वेदना होत असल्याने तात्काळ डॉक्टरांची टीम तिला उपचार देण्यासाठी सरसावली. त्यामुळे वयोवृद्ध आजी सध्या धोक्यातून बाहेर असून तिला पुढील उपचारासाठी नगरच्या दिशेने पाठवण्यात आले आहे.

प्रयत्न अपुरे पडले …
सदरच्या अपघातात 17 लोक जखमी झाले होते. परंतु त्यातील निलाबाई पांडुरंग चकोर वय ५५, या मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ वाटत होत्या. त्यांच्यावर अधिक जखमा दिसून येत नव्हत्या तरीही त्या घाबरलेल्या अवस्थेत असल्याने डॉक्टरांनी त्यांना तात्काळ उपचार देण्याचे ठरवले. यावेळी चार ते पाच डॉक्टर सर्व कर्मचारी त्यांच्या जवळ उपचारासाठी प्रयत्न करत होते. त्यांना त्या ठिकाणी स्थिर करण्यात त्यांना यशही आले. पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे पाठवत असताना रस्त्यातच ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच परिसरात त्यांचा मृत्यू झाला तिथूनच त्यांना माघारी आणण्यात आले.

अपघातातील जखमींची नावे…
सतीश रामदास हाळदे वय ३५, सुमन रामदास हाळदे वय ५५, मंदा हरिभाऊ हाळदे वय ५५, जिजाबाई दौलत हाळदे वय ८०, रंभाबाई गंगाधर हाळदे वय ८०, लक्ष्मीबाई गोविंद हाळदे, सजुबाई रामनाथ हाळदे, सिंधुबाई ज्ञानेश्वर गोसावी वय ५५, सागर गुजाराम हाळदे वय २९, रावसाहेब बाळासाहेब हाळदे वय ५५, निर्मला रावसाहेब हाळदे वय ४८, चंद्रभागा गोविंद कातकाडे वय ६०, कमल रामदास हाळदे वय ६६, ऋषीकेश रामदास कातकाडे वय २७, बेबी बाबुराव बागले वय ६५, रत्नाबाई रामदास हाळदे वय ५६ सर्व रा. ओणे ता. निफाड जिल्हा नाशीक अशी जखमींची नावे आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE