पंचायत समीती नंतर जिल्हा परिषदेच्या सहा गटांचे आरक्षण जाहीर ; तालुक्यात महिलाराज
करमाळा- विशाल (नाना) घोलप
करमाळा पंचायत समिती पाठोपाठ जिल्हा परिषद सदस्यांची ही यादी जाहीर झाली आहे. तालुक्यातील सहा गटांसाठी सदरचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून मागील वेळच्या आरक्षणात व यंदाच्या आरक्षणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मागील वेळी तीन अनुसूचित जाती आरक्षण पडले होते. परंतु यांना एकही अनुसूचित जाती आरक्षण दिसून येत नाही.

तर त्याचप्रमाणे तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये आता महिला राज दिसून येणार आहे. सहा पैकी पाच जागांवर महिलांना संधी मिळाली असून केवळ चिकलठाण येथील जागेवर सर्वसाधारण जागा आरक्षित आहे. त्यावर महिला किंवा पुरुष दोघेही उभा राहू शकतात. चिकलठाण येथे महिलेला संधी मिळाल्यास तालुक्यातील सर्वच जागा महिलांसाठी असू शकतात असे दिसून येते.
करमाळा तालुक्यातील सहा गटातील आरक्षण पुढीलप्रमाणे…
पांडे -सर्वसाधारण महिला
वीट – सर्वसाधारण महिला
कोर्टी- सर्वसाधारण महिला
चिकलठाण – सर्वसाधारण
वांगी- सर्वसाधारण महिला
केम -ओबीसी महिला

