करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा MIDC तुन आश्वासानांचा धूर ; कुचकामी कारभारामुळे युवकांचे भविष्य अधांतरी

करमाळा समाचार

तालुका अनेक वर्षांपासून औद्योगिक विकासाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये MIDC उभ्या राहिल्या, कारखाने आले, रोजगार निर्माण झाले; मात्र करमाळा अजूनही आश्वासनांच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतो. परिणामी येथील हजारो युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, सोलापूर आणि इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे.
करमाळ्यात शिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना स्थानिक पातळीवर उद्योगधंदे नसल्याने तरुणांच्या हाताला कामच उरलेले नाही. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची परिस्थिती आधीच बिकट असताना रोजगाराचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे युवकांची लग्न रखडले, गाव ओस पडली तरी नेतेमंडळी आणि सरकार झोपेतून जागे कधी होणार? असा सवाल आहे.

निवडणुका आल्या की विकासाची मोठमोठी स्वप्ने दाखवली जातात. MIDC आणू, उद्योग उभे करू, रोजगार निर्माण करू अशी आश्वासने दिली जातात; पण निवडणूक संपली की विषय थंड बस्त्यात जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. हे फक्त एका गटाने पक्षाने दिलेले आश्वासन नाही तर छोट्या मोठ्या पुढऱ्याने हा मुद्दा करून दुसऱ्याला शिव्या दिल्या पण निवडणुका झाल्या की पुढे काय? करमाळ्यातील युवक आता थेट प्रश्न विचारत आहेत.

“आमच्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार?”
“करमाळ्याला उद्योग नकोत का?”
“फक्त राजकारण आणि आश्वासने यावरच तालुका चालणार का?” आज गरज आहे ती राजकीय श्रेयवाद सोडून सर्वपक्षीय प्रयत्नांची. करमाळ्यासाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीचा ठोस आराखडा उभा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा आगामी काळात बेरोजगारी आणि स्थलांतर हा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गावोगावी युवकांच्या हाताला काम नाही अवैध धंदे वाढू लागले. गुंडगिरी, चोऱ्या, उपासमारी सुरु झाली पाऊस आला तर एवढा की सगळे नुकसानच. इतर वेळी पाऊस तोंडचं दाखवत त्यामुळे शेती ओस पडत चालली. गटार, समाज मंदिर, मुरूमीकरण असले बारीक सारीक कामे केले की नेते आणि कार्यकर्ते खुश पण उत्पन्न वाढीचा दृष्टिकोण कोण ठेवणार? असो अजूनही वेळ गेली नाही. ज्या नेत्याच चालत त्याने करा पण आमचे काम करा तालुक्याला midc आणा. आता ह्या मुद्द्यावर एकमेकांना शिव्या घालण्याचा तुम्हाला तरी अधिकार आहे का? हे लक्षात ठेऊन तयारीला लागा.

सरकार कोणतेही असो इथले नेते जाऊन चिकटतात पण विकास काय होत नाही. आमच्या नेत्यांना दिसत नसल तरी सरकारला हे दिसत नाही का? सरकार हे जरी पक्षाचे असले तरी ते जनतेसाठी असतें त्यांना इथली युवकांची अडचण समजात नाही का? ज्या पद्धतिने तुमचा राज्यभर लागू होणारा नियम खर्च आम्ही पण बघतो व उचलतो तसच राज्यभरत सुविधा देता त्यांना आम्हाला का नको?…

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE