करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा पोलिसांची धडक कारवाई; शाहूनगरातून २ लाख ६७ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

करमाळा

करमाळा शहरातील शाहूनगर परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. शिंदे हॉस्पिटलसमोरील एका घरावर शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत एकूण २ लाख ६७ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील इस्माईल तांबोळी (वय ५३, रा. शाहूनगर, करमाळा) याच्या ताब्यातील जागेत विक्रीसाठी साठवून ठेवलेला प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका रमेश पाटील यांच्या उपस्थितीत तसेच पंचांसमक्ष जप्त मुद्देमालाची मोजणी करण्यात आली.

या कारवाईत विमल पानमसाला, व्ही-१ सुगंधित तंबाखू, हिरा पानमसाला, रॉयल ७१७, आरएमडी, एम सुगंधित तंबाखू, रजनीगंधा, विविध रंगांच्या पाकिटांतील विनालेबल सुगंधित तंबाखू आणि रत्ना ३००० सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९२६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, करमाळा उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. आणि करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, पोलीस हवालदार मंगेश पवार, अभिजित मोहोळकर, बाळसराफ, योगेश खराडे तसेच पोलीस अंमलदार संभाजी पवार, गणेश गुटाळ, अनिल निकम, सोमनाथ गावडे आणि महिला पोलीस अंमलदार विद्या इंगोले यांच्या पथकाने सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील करीत आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE