करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा नगरपरिषदेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी

करमाळा समाचार

करमाळा नगरपरिषदेमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

डॉ. कलाम यांच्या स्मृतींना अभिवादन करून वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजात वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि ज्ञान, विचार व संस्कारांची जोपासना व्हावी, हा या दिनामागील प्रमुख उद्देश आहे.

यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, स्वप्निल बाळेकर, हिंदुराव जगताप, सचिन सुडके, सचिन घाटोळे, दत्तात्रय घोलप, अभय देशपांडे, गजानन राक्षे, सोमनाथ सरोदे, आकाश वाघमारे, विपुल पुजारी, अश्विनी जाधव, शितल बहाड तसेच श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर येथील वाचक, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

या उपक्रमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE