करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या ४२ व्या करमाळा शाखेचे उद्या उद्घाटन

करमाळा समाचार :

सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर यांच्या नवीन ४२ व्या करमाळा शाखेचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या नवीन शाखेमुळे करमाळा शहरासह परिसरातील नागरिकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या शाखेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक मा. नानासाहेब जाधव यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करमाळ्याच्या नगराध्यक्षा मा. सौ. मोहिनी सावंत तसेच पंढरपूर जिल्हा संचालक मा. डॉ. रमेशजी सिद्ध उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, शाखा व्यवस्थापक गणेश उभेदळ यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या करमाळा शाखेचे कार्यालय शहरातील सर्व्हे क्रमांक ३२१८, शहा (जवळेकर) हॉस्पिटलशेजारी, मेन रोड, करमाळा येथे सुरू करण्यात येत आहे. बँकेच्या माध्यमातून गृहखरेदी, शैक्षणिक, वाहन, व्यावसायिक, सोनेतारण, हरित ऊर्जा, प्लॉट खरेदी, जीवन विमा आदी विविध कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सहकार, विश्वास आणि आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय सुरू होत असताना या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE