लेडी सिंघम ॲक्टीव्ह मोडवर – रात्री अडीच वाजता वाळु वाहतुक करणाऱ्यावर कारवाई
करमाळा समाचार
बऱ्याच दिवसांपासून निवडणुकांचा व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे तहसीलदार शिल्पा ठोकडे या निवडणूक प्रक्रियेमध्ये लक्ष घालून होत्या. याचा फायदा उचलत काही वाळू वाहतूक करणारे निर्भीडपणे रात्रीत वाळू वाहतूक करत होते. पण अखेर लेडी सिंघम शिल्पा ठोकडे या ॲक्टिव्ह मोड मध्ये आल्या व त्यांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जातेगाव रस्त्यावर एक ट्रक ताब्यात घेतला आहे. त्यावर कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे.

वाळू चोरांसाठी कर्दनकाळ ठरत असलेल्या लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या शिल्पा ठोकडे यांनी करमाळा तालुक्यात आल्यापासून वाळू उपसा करण्याचे प्रमाण कमी झालेले दिसून आले होते. तर कुठेतरी चालू असल्याच्या बातम्या ही सुरू होत्या. तर बाहेरून आणणाऱ्या वाळूवर प्रशासनाचे लक्ष नसल्याचेही बोलले जात होते. परंतु निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमांमध्ये असल्यामुळे प्रशासनातील प्रमुख अधिकारी ठोकडे मॅडम यांना याकडे लक्ष देता येत नव्हते. पण रात्री अचानक त्यांनी कारवाई केल्याने पुन्हा एकदा वाळू चोरांची धाबे दणानले आहेत.

मुळातच ठोकडे मॅडम आल्यापासून वाळू चोरून मध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे बरेच जण वाळू चोरी करण्याचे थांबून वेगळा व्यवसाय चालू केला होता. पण काही निर्भीडपणे वाळू चोरी करीतच होते. त्यावर ठोकडे यांची नजर असली तरी ते मिळून येत नव्हते. शेवटी जातेगाव हद्दीत रात्री अडीचच्या सुमारास ठोकडे यांनी एकट्यानेच सापळा रचला व संबंधित वाळू चोराला ताब्यात घेतले आहे.