करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

पेरु विक्रीच्या बहाण्याने पाटल्यांची चोरी करणाऱ्या चोरांचा विडिओ आला समोर

प्रतिनिधी- करमाळा समाचार 

पेरु विक्रीच्या बहाण्याने वृद्ध महिलेच्या घरात जाऊन बोलण्यात गुंतवून महिलेच्या हातातील तब्बल चार तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या घेऊन दोन चोरांनी पलायन केल्याचा प्रकार करमाळ्यात खंदकरोड खडकपुरा गल्ली येथे गुरुवारी दि 30 जुलै रोजी सकाळी आकराच्या सुमारास घडला होता.  याप्रकरणी चंपाबाई पोपट साळुंखे (वय ७६) रा. खंदकरोड, खडकपूरा यांनी फिर्याद दिली आहे. तर दोन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकरा वाजता दोन जण क्रमांक नसलेल्या पल्सर  मोटारसायकल खडकपूरा येथे पेरुचे कारंडी घेऊन आले. चंपाबाईंचा भाचा हा शिक्षक आहे. त्यामुळे त्या दोघांनीही घरात प्रवेश करण्याआधी गुरुजी आहेत का ? त्यांना पेरू द्यायचे आहेत असे म्हणून घरात प्रवेश केला. त्यानंतर माझ्या भावाचे लग्न आहे. आपल्या हातातील पाटल्याची साईज बघायचे आहे. दाखवता का असे म्हणून हातातील पाटली काढून घेतली. नंतर चंपाबाईच्या सोबत त्यांची भाऊजय होती. तीला चोरांनीच चहा करायला सांगितला. व एकजण त्यांच्यावर पाळत ठेऊन होता. तेवढ्यात दोन्ही हातातील एक लाख रुपयांच्या पाटल्या काढुन घेतल्या व तुमच्या हाताचे रक्त येत आहे असे म्हणून हात धुण्यासाठी जा म्हणुन सांगितले . चंपाबाई उठल्यानंतर दोघेही अनोळखी पुरुष पळून गेले. त्यांच्या अंगावर पांढरे फूल बाह्यांचा शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेले होते. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रकाश वाघमारे हे करीत आहेत. यांच्या बाबत माहीती मिळाल्यास 02182-220333, 73505 13100 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE