उत्कृष्ट कामगिरी करीत प्रेक्षकांची मने जिंकणारा करमाळा वकीलांचा संघ ठरला उपविजेता
करमाळा समाचार

स्व. काकासाहेब थोबडे फाउंडेशन व सोलापूर बार असोसिएशन यांच्या वतीने आयोजित काकासाहेब थोबडे क्रिकेट स्पर्धांमध्ये करमाळा बार असोसिएशनच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेत्या स्थानवर मजल मारली. सदरच्या स्पर्धा सोलापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत 25 संघानी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये सोलापूर येथील दिग्गज संघ व खेळाडू खेळताना दिसले. अंतिम सामन्यात मंगळवेढा संघाकडून करमाळा संघाला पराभव स्वीकारावा लागला. विजेत्यांचे अभिनंदन आयोजक ज्येष्ठ ॲड. मिलिंद थोबडे यांनी केले.

अवघ्या चार ते पाच दिवसांच्या सरावानंतर करमाळा बार असोसिएशनची खेळाडू हे सोलापूर येथील मैदानात संघर्ष करण्यासाठी उतरले होते. यावेळी केवळ पहिल्या दोन गटात चार इतर गटात तीन संघ असल्याने करमाळा संघाला पहिल्या गटातून तीन संघांचा पराभव करीत पुढे जावे लागले. यामध्ये माढा, सोलापूर बार A, सोलापूर येथील लिगल लेजंड यांच्याशी झुंज द्यावी लागली व एकतर्फी सामने जिंकत करमाळा संघाने उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
यावेळी उपात्यंपुर्व फेरीत करमाळा संघाचा सामना सह्याद्री वॉरियर्स सोलापूर यांच्याशी झाला. अटीतटीच्या सामन्यात सह्याद्री वॉरियर्स वर मात करीत करमाळा संघाने उपांत्य फेरी गाठली. या ठिकाणी दिग्गज संघाचा पराभव करीत पुढे आलेल्या पंढरपूर संघाचा एकतर्फी पराभव करत करमाळा संघाने अंतिम फेरीत धडक दिली. त्यानंतर अंतीम सामन्याला उशीर झाला यामुळे षटके कमी केले. याचा फटका करमाळा संघाला बसला. केवळ चार षटकांच्या सामन्यात गडबडीत व घाईत झालेल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात करमाळा संघाला अपयश आले. तरी गोलंदाजांनी संघर्ष करीत सामना अंतिम षतकापर्यंत नेऊन ठेवला. अखेर त्यांना पराभव पत्करावा लागला. पण कडवी झुंज दिली. सदर संघात ॲड. अमर शिंगाडे, ॲड. शिवराज शेरे, ॲड. अजित विघ्ने, ॲड. निखिल पाटील, ॲड. विश्वजित बागल, ॲड. माऊली टापरे, ॲड.स्वप्नील यादव, ॲड. ओंकार मुसळे, ॲड. किरण वीर, ॲड. विशाल घोलप, ॲड. प्रियाल आगरवाल, ॲड. मनोज कांबळे, श्री. शशिकांत शेजुळ, अमोल राऊत, मार्गदर्शक ॲड. सुहास मोरे आदि सहभागी झाले होते.

जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन करमाळा संघाने केलेल्या कामगिरीचं त्या ठिकाणीही कौतुक झालं. यावेळी गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर संघाचा कर्णधार ॲड. विश्वजीत बागल यांना मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज अशी पारितोषिके मिळाली. त्याच पद्धतीने माऊली टापरे व ओंकार मुसळे यांनीही उत्कृष्ट फलंदाजी करीत संघाला अंतिम फेरी गाठण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. तर गोलंदाजीत ॲड. विश्वजीत बागल, ॲड. विशाल घोलप, ॲड. अमर शिंगाडे, ॲड. नंदकुमार शेरे यांनी संघाला प्रत्येक धावसंख्येत अंतिम सामना जिंकण्यासाठी संघर्ष केला व संघाला विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यानंतर ॲड.मिलिंदजी थोबडे, ॲड.भारत कट्टे, ॲड.उमेश मराठे, सोलापुर बारचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड.आळंगे, ॲड. चिंचोळकर मॅडम, ॲड.देशमुख मॅडम, आयोजक ॲड. रितेश थोबडे व सर्व मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

