जिंती येथे ग्रामपंचायत नूतन इमारतीचे भूमीपूजन
जिंती – दिलीप दंगाणे
आज जिंती येथे ग्रामपंचायत नूतन इमारतीचे भूमीपूजन जिल्हा परिषद मा सदस्य शहाजीराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.

कोरोना पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने भूमिपूजन केले.चौदा लाख रूपये निधीच्या कामाने मिटींग काॅन्फरन्स हाॅल तसेच स्वतंञ सरपंच,ग्रामसेवक कॅबीन अशा नव्या इमारतीच्या रूपाने हे काम पूर्ण होणार आहे.

यावेळी सरपंच संग्राम राजेभोसले, वाल्मिक वाघमोडे, हरिश्चंद्र वारगड, हनुमंत पोटे, कैलास पोळ, दत्ताञय शेलार, माजी उपसरपंच धर्मेंद्र धेंडे, नाना वाघमोडे, सतिश शेलार, मुरलिधर ओंभासे, संजय जोशी, गणेश घोरपडे, काॅन्ट्क्टर राहुल खाटमोडे साहेब आदी उपस्थित होते.