करमाळासोलापूर जिल्हा

पाटील यांच्या कर्तुत्वावर आपले आरोप नाहीत पण… आ. शिंदेंचा पाटील यांना मिश्किल टोला

करमाळा समाचार 

 

2017 मध्ये पूर्वीच्या आमदारांनी निधी संपल्यानंतर तत्कालीन आमदार पाटील यांनी निधी उभारणे गरजेचे असताना असे त्यांना करता आले नाही. तसं त्यांचे वरिष्ठ पातळीवर वजनही होतं असा आपण ऐकून आहोत. त्यांच्या कर्तुत्वावर आपले आरोप नाहीत ते कामही करत असतात पण रिझल्ट मिळत नाही असा मिश्किल टोला आमदार संजयमामा शिंदे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजना च्या निधीवरुन विचारलेल्या प्रश्नावर लगावला आहे.

साडे येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन व वृक्षारोपण प्रसंगी आमदार शिंदे आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नावर आमदार संजय मामा शिंदे यांनी उत्तरे दिली.

दहिगाव योजनेत आवर्तनात या वेळी आलेल्या अडचणी पुढील काळात न येता त्या सर्व मार्गी लावल्या जातील. यंदा चालू असलेल्या कार्यक्रमापेक्षा अधिक वेळ वाढवण्याचा प्रयत्न राहील. तर पुढल्या वेळी शेतकऱ्यांना घरी बसुन पाणी पोहोचेल. या वेळी जेवढा त्रास झाला एवढा पुढील वेळी होणार नाही. याची दक्षता घेण्यासाठी आपण सर्व यंत्रणा सज्ज करीत आहोत. तर नुसत्या सुप्रिमा मंजूर करून आपण थांबणार नसून पहिल्या दोन अधिवेशनामध्ये 100 कोटी निधी आणण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. तर योजना २०२४ पर्यत पुर्ण करण्यावर भर राहणार आहे.

मागील विधानसभा निवडणुकांपूर्वी 2014 च्या दरम्यान घोटी परिसरातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही काही ना काही स्वरूपात त्या ठिकाणी पाणी पोहोचविण्यात आले व उसाच्या लागण्या दिसु लागल्या तर लोकाना परिवर्तन दिसु लागले.

आपण आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांना पैसे मागा म्हणून सांगितलेलं नाही. जेव्हा पिकाचे रुपांतर पैशात होईल तेव्हा लोकच आपोआप पैसे भरायला पुढे येतील व आठवणीने भरतील असा आपला विश्वास आहे व अनुभव आहे असे ही शिंदे म्हणाले. यावेळी दत्तात्रय जाधव, युवा नेते शंभूराजे जगताप, उद्ध्व माळी, तानाजी झोळ, विलास पाटील, अशपाक जमादार, मानसिंग खंडागळे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE