करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना व्यवसायासाठी छत्र भेट

करमाळा – सुनिल भोसले

करमाळा तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत व्यसायाकांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी कृषी सहायक अधिकारी गाडे म्हणाले, आम्ही ‌शभर छत्राची मागणी केली होती. त्यापैकी बत्तीस छत्र्याना मंजुरी मिळाली. ‌त्यापैकी पांडे येथील शेतकरी सतीष अनारसे, अशोक महोळकर,आप्पा दुधे,लक्ष्मण कोल्हे, यांना व्यवसायासाठी छत्र्या वाटप करण्यात आल्या.

यावेळी उपसभापती दत्तात्रय सरडे, बोलताना म्हणाले जो पिकवेल तो विकेल यांना सावलीसाठी छत्र्या दिल्याने उन्हापासून त्यांचे व विक्री साठी आणलेल्या मालाचे संरक्षण झाल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यापुढे ही याच योजनेअंतर्गत काटा माफे देऊन त्यांना बसण्यासाठी जागेची उपलब्धता करावी असे उपसभापती म्हणाले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे उद्घाटन देवीचामाळ (करमाळा बायपास) येथे मा. श्री समीर माने साहेब, तहसीलदार, करमाळा व पंचायत समिती उपसभापती मा.दत्तात्रय सरडे पंचायत समिती अॅड राहुल सावंत यांचे शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी गणेश दुरंदे साहाय्यक कृषी अधिकारी गाडे , कृषी पर्यवेक्षक काळे ,मंडळ कृषी अधिकारी, आत्माचे राजाभाऊ कदम, सुनील भोसले , शेतकरी गटाचे शेतकरी विक्रीसाठी भाजीपाला फळ पिके घेऊन उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE