आय पी एल यंदा किती जणांना घेऊन जाणार ; खेळा आडुन सुरु आहे जुगार ?
करमाळा समाचार –
आयपीएल हा खेळ दुबईत जरी सुरू असला तरी देशातील गावागावातून त्यावर सट्टा खेळणारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शंभर रुपयापासून लाखो रुपयांची उलाढाल यावर ग्रामीण भागातून केली जाते. विशेष म्हणजे हा सट्टा कुठेही एकत्र न बसता ही खेळला जाऊ शकतो. तर यामुळे आजपर्यंत बऱ्याच तरुणांना आपले गाव सोडून तर काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यंदा किती जण या रोगाने संक्रमित होतील याकडे प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

यापूर्वीही कर्जबाजारी होऊन अनेक जणांनी आपले गाव आपले. शहर सोडून दुसर्या गावात जाणे पसंत केले आहे. या खेळाचे वैशिष्ट्य असे आहे की याला कोणताही ही गॉडफादर असावा असे नाही दोन मित्र ही एकमेकांसोबत शर्यती लावू शकतात. त्या शर्यतीची रक्कम खेळण्यासाठी उधारी होते, कर्जबाजारी होते आणि त्यातूनच संबंधित युवकां पैकी एकाचा जीव जाणे हे निश्चित आहे. आयपीएल या खेळाकडे खेळाडू एक खेळ म्हणून पाहतात तर सट्टा खेळणारे मात्र याकडे एक प्रकारचा जुगार आणि पैसे कमवण्याची संधी म्हणून पाहत आहेत. यातूनच आजपर्यंत बेरोजगार तरुणांना कर्जबाजारी आणि जुगारीची सवय लागून गेली आहे. त्यामुळे झटपट पैसे कमावण्याच्या नादात हा खेळ ग्रामीण भागातूनही खेळला जात आहे. साधारण एक रुपयापासून ते लाखो रुपयांची याची उलाढाल पाहता यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. कारण यापूर्वीही अनेक जण यामुळे अडचणीत आलेले आहेत. नाणेफेकी पासून ते प्रत्येक चेंडूवर, चेंडूपासून सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच पर्यंत सर्वच क्रियांवर सट्टेबाजी केली जाते व युवकांना यांच्या जाळ्यात घेतले जात आहे.

मागील आयपीएलच्या प्रत्येक सिजर नंतर अनेक तरुण यामुळे बाधित झालेले दिसून आले होते. एक वेळ कोरोना परवडला पण आयपीएलची जुगार हा खेळ न परवडणारा खेळ आहे. करमाळा तालुक्यातील बस स्थानकावर एक गोळ्या बिस्किट विकणारा युवक ही असाच या जाळ्यात अडकला आणि आज त्याला आपले गाव सोडून पळून जावे लागले आहे. अशाच प्रकारचे अनेकांनी गाव सोडले, अनेक कर्जबाजारी झाले, तर काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. पण याची अधिकृत कोठेही नोंद नसल्याने आजही हा खेळ युवकांची पसंती तर पालकांची डोकेदुखी बनला आहे. यामुळे प्रशासनाने अशा टोलनाक्यांवर लक्ष ठेवून कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
खेळ असल्याने दुर्लक्ष तर ऑनलाईन जुगाराकडे कल ..
प्रत्येकाच्या घराघरात टीव्ही असल्याने हा खेळ म्हणून पाहिला जाणारा प्रकार जुगारही असू शकतो याची कल्पना नसल्याने पालकही याकडे दुर्लक्ष करत आहेत. तर ऑनलाइन अधिकृत वेबसाइटवरून यावर उघडउघड जुगार खेळला जात आहे. यावर कसलीही बंदी नसल्याने तरुण युवक याकडे खेचला जात आहे. त्यामुळे देशात फक्त चीनचे बंद करून भागणार आहे का ? अशा प्रकारच्या जुगारावरही बंदी यायला हवी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.