उत्तर प्रदेशातील दलित मूलीचा बलात्कार व मृत्यु प्रकरणी करमाळ्यात निषेध
करमाळा समाचार –
हथरस उत्तर प्रदेश येथील एका दलित मूलीला सामूहिक बलात्कार करून क्रूरपणे जखमी केल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यानंतरही तिच्या घरच्यांच्या हवाली मृतदेह न करता परस्पर दहन केला अशा या क्रूर घटनेचा आम्ही निषेध करत असून उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असून संबंधित गृह खात्याचे प्रमूख म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोषी मानून त्यांच्या वर सदोष मनूष्यवधाचा गून्हा दाखल करावा अशी मागणी रिपाई (आ) चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेशजी कांबळे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी ता. उपाध्यक्ष नितिन दामोदरे, यूवक तालुकाध्यक्ष यशपाल कांबळे, प्रफुल्ल दामोदरे, यूवराज ओहोळ, धनराज सरोदे, नवनाथ अवचर, शहाजी अवचर, प्रसेनजित कांबळे, भिमराव कांबळे, गितेश लोकरे, रणजित कांबळे, नंदू भालेराव, महादेव रणदिवे, योगेश खरात, मयूर कांबळे, किशोर कांबळे, सुगत कांबळे, ताया वाघमोडे इ उपस्थित होते.
