करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी पदी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती

सोलापूर 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ़ शितलकुमार दत्तात्रय जाधव यांची नियुक्ती झाली आहे, तत्पुर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांच्या बदलीबाबत अद्याप तरी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

दरम्यान, डॉ़ शितलकुमार जाधव हे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कृष्ठरोग) येथे कार्यरत होते, मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्याकडे सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदाची सुत्रे देण्यात आली होती़ दरम्यान, त्यांनी केलेल्या विनंतीनुसार सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णय २९ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE