करमाळासोलापूर जिल्हा

ऐतिहासिक बौद्ध स्तूपांची हस्तांतरण करण्याची मागणी

करमाळा समाचार

आपल्या देशाची जागतिक स्तरावर बौद्ध जन्मस्थळ व कार्यस्थळ अशी ओळख आहे. सम्राट अशोक व अन्य सम्राटांनी अनेक स्तूप व विहारांची रचना केली आहे. हा ऐतिहासिक ठेवा असून त्याचे संरक्षण, संवर्धन व देखभालीसाठी हस्तांतर करण्यात यावे अशी मागणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या करमाळा युनिटच्या वतीने तहसीलदार करमाळा यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे केली आहे. सदरचे निवेदन तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसिलदार शांताराम किरवे यांनी स्वीकारले.

यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बुलडाण्यातील भोन, उस्मानाबाद येथील तेर, नागपुर मधील कुही तालुक्यातील आडम, भंडारा मधील पवनी, अकोल्यातील पातुर ते बाळापुर रोडवरील दोन बौद्ध विहार, नाशिक येथील त्रिरश्मी लेणी, कार्ला लेणी आदिसंदर्भात पुरातन स्मारके आणि पुरातत्व साइट आणि अवशेष ॲक्ट 1958 नुसार बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्ककडे हस्तांतरण करण्याबाबतचा निर्णय घेण्याची मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कचे सोलापूर जिल्हा महासचिव भीमराव कांबळे, गौतम खरात, सचिन खरात, बजरंग खरात, अमृत गायकवाड, हरी खरात, संतोष दाभाडे, रोहन गरड, संजय कांबळे, कल्याण कदम, दिपक भोसले यांच्यासह दिनेश दळवी, कय्युम शेख, दिनेश माने, विनोद हरिहर, शहाबुद्दीन शेख, सागर बनकर, जावेद मणेरी, बाबुराव जाधव आदींनी या मागणीचे समर्थन केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE