करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

कंत्राटी कर्मचाऱ्यांची पगार परस्पर हडपली ; ठेकेदार व सुपरवायझर वर गुन्हा दाखल

करमाळा समाचार – विशाल घोलप 

महावितरण कंपनीसाठी खाजगी कंत्राटदार यांच्या माध्यमातून कामास असलेल्या दोघांची पगार झालेली असताना संबंधित कामगारांना न देता फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदार व सुपरवायझर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २६ जानेवारी रोजी तक्रार दिली त्यावरून दोन लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. ठेकेदार अशपाक शेख व सुपरवायझर इकबाल इनामदार असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी बाळू भांडवलकर रा. वडगाव उत्तर याने करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. नोव्हेंबर २०२३ ते मे २०२४ या दरम्यानची पगार मिळाली नसल्याची दोघांची तक्रार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळू भांडवलकर व तात्या वीर असे दोघेही दरमहा १८ हजार पाचशे रुपये प्रमाणे सोनू सर्विसेस या कंपनीसाठी काम करत होते. एम एस सी बी च्या विविध कामांसाठी खाजगी लोक पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट सोनू सर्विसेस सोलापूर या कंपनीने घेतला होता. सदर कंपनीचे मालक अशपाक शेख हे आहेत व इकबाल इनामदार रा. कोर्टी ता. करमाळा हे कंपनीचे सुपरवायझर म्हणून काम पाहतात. नोव्हेंबर २०२३ पूर्वी महावितरणच्या विविध कामांसाठी लोक पुरवण्याचा ठेका हा दुसऱ्या इसमाकडे होता, त्यावेळी वेळोवेळी व नियमित पगार होत होते. परंतु नोव्हेंबर २०२३ पासून सोनू सर्विसेस या कंपनीने ठेका घेतल्यापासून पगार वेळेवर दिला नाही. नोव्हेंबर २०२३ ते मे २०२४ पर्यंत नियमित काम केले आहे.

politics

या दरम्यानच्या काळात पगार न झाल्याने सुपरवायझर इनामदार यांच्याकडे विचारणा केली असता कंपनीने पगार काढला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यानंतर मे २०२४ मध्ये सदरचा ठेका हा अमित टोणपे यांच्याकडे गेला. त्यानंतर पगार वेळेचे वेळेवर होत राहिला. तर महावितरण कार्यालयाकडे नोव्हेंबर २०२३ ते मे २०२४ या पगाराबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रत्येक महिण्याचा पगार हा कंत्राटदार व सुपरवायझर यांच्याकडे ज्या त्या महिन्यात दिल्या असल्याचे सांगितले. त्यावेळी सदरचा पगार परस्पर विलेवाट लावण्याची खात्री झाली. असाच प्रकार तात्या वीर यांच्यासोबत घडला आहे.

दोघांचे मिळून दोन लाख ५९ हजार रुपये सोनू सर्विसेस कंपनीचे ठेकेदार अश्फाक शेख व सुपरवायझर इकबाल इनामदार यांनी न दिल्याचे खात्री पटली, यावरून करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE