करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

भारतीय बौध्द महासभा करमाळा शाखेच्या वतीने 64 वा‌ सम्राट अशोक विजया दशमी दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी सुनिल‌ भोसले


भारतीय बौद्ध महासभा करमाळा तालुका व शहर यांचे वतीने करमाळा शहरातील भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयामधे दिनांक 25/10/2020 रोजी. 64 वा सम्राट अशोक विजया दशमी “दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

 

या वेळी तथागत भगवान बुद्ध आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सम्राट अशोक राजा यांच्या प्रतीमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार घालून भारतीय बौद्ध महासभेच्या धम्म संस्कार विधीनुसार सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली .जमबो दिपातील पाटलीपुत्र प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा जगभर केलेला प्रचार आणि प्रसार तसेच धम्मचक्र परावर्तित कसे केले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हाच धागा पकडून अशोक विजया दशमी दिवशीच 33 कोटी देव-देवतेस माननारे हिंदू धर्माचा त्याग करून पवित्र अशा मंगलमय बौद्ध धम्माचाच स्विकार का केला या विषयावर बौद्धाचार्य: प्रशांत कांबळे यांनी सखोल माहिती सांगितली.

शेवटी ज्या घरात देव असेल त्या घरातील कुठलाच बौद्ध विधिवत कार्यक्रम घेण्यात येणार नाही असे घोषित केले शेवटी प्रा रामटेक मॅडम यांना गंरथालयाची पी एच डी ही पदवी मिळाल्याबद्दल त्याचा सन्मान शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथराव कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते.

आयु. दशरथराव कांबळे, आयु.रमेशराव कांबळे अॅड.महादेव कांबळे, अॅड.अनिल कांबळे, आयु. लक्ष्मणराव भोसले, बौद्धाचार्य: सावताहरी कांबळे, आयु एस.पी. कांबळे, आयु.महाराजा कांबळे आयु. सचिन अब्दुले सर,आयु. भिमराव कांबळे सर, आयु.एल.यु.कांबळे सर ,आयु. नितीन कांबळे सर,आयु. भिमराव कचरू कांबळे,आयु.अंकुश कांबळे,रितेश कांबळे आयु.दादा कांबळे, आयु. राकेश लोंढे,आयु कालु कांबळे, आयु. जयराज आवाड, आयु. अप्पा कांबळे, आयु भाऊनाना कांबळे, आयु.नि.शोभाताई कांबळे, पुष्पाताई कांबळे, कविता कांबळे, राधाबाई कांबळे, निलावती कांबळे,सुजाता कांबळे, तसेच सर्व लहान ,थोर मंडळी मुले,मुली आणि भारतीय बौद्ध महासभेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आभार बौद्धाचार्य: सावताहरी कांबळे यांनी मानले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE