टोळी चालकाची मुजोरी तोडणीसाठी पैसे कमी कर म्हणाल्यावर शेतकऱ्याला शिवीगाळ ; कारवाईची मागणी

करमाळा समाचार

अतिरिक्त उसाचा प्रश्न आता आ वासून उभा राहिला आहे. श्री. आदिनाथ कारखाना बंद पडल्यानंतर आता तालुक्यातील शेतकऱ्यांवर टोळी चालकाचे तसेच कारखानदारांचे पाय पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी भलताच अडचणीत आलेला असताना त्याचा फायदा उचलत टोळी चालकांनी ऊसतोडणीसाठी आव्वाचे सव्वा भाव घेऊन ऊस तोडणी करत आहेत. या वेळी ऊस तोडणीसाठी पैसे देण्याचे टाळल्यास वादविवाद होत आहेत. यातील एक प्रकार आज करमाळा तालुक्यातील साडे येथे उघडकीस आला आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या ऊसतोडणीसाठी टोळी चालकाला फोन केल्यानंतर त्याने सहा हजार रुपये भाव सांगितलेला प्रकार हा नुकताच उजेडात आला होता. या प्रकरणातील शेतकऱ्यांनी संबंधित टोळी चालकाला संपूर्ण माहिती बोलून रेकॉर्डिंग करून वायरल केल्यामुळे इतर ठिकाणी हा प्रकार घडत असल्या बाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. पण नेमकी ती रेकॉर्डिंग कोणत्या गावची होती हे कोणाच्या लक्षात आले नव्हते. सदर रेकॉर्डिंग आपल्यासमोर आपण देत आहोत.

*

शेतकऱ्याची कशी होतेय लुट , उस तोडणीसाठी मागितले जात आहेत जास्तीचे पैसे – क्लिप व्हायरल*

 

त्याशिवाय सदरची ही रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर करमाळा तालुक्यात ही अशाप्रकारे शेतकऱ्यांची लूट होते ही समोर आले आहे. नुकतेच साडे येथील एका शेतकऱ्याला टोळी चालकांनी ऊस तोडणीसाठी पैसे मागितलेली रेकॉर्डिंग पुन्हा एकदा पुढे आली आहे. परंतु या रेकॉर्डिंग मध्ये कहर म्हणजे त्या टोळी चालकाला पैसे कमी कर म्हणून सांगितल्यानंतर टोळी चालकाने शेतकऱ्याला शिव्या दिल्याचे समोर आले आहे. म्हणजेच टोळी चालक हा मुजोर असल्याचे दिसून येत आहे. उलट शिवी देऊनचे देऊन तू काय आमदार आहे का ? तुला मी नीट बोलायला असं म्हणून स्वतःची चूक मान्य करायलाही तयार नसल्याचे दिसून येत आहे.

*आता तर हद्दच झाली.. ऊसतोडीसाठी पैसे कमी कर म्हणल्यावर शेतकऱ्याला केली टोळी चालकांने शिवीगाळ करमाळा तालुक्यातले प्रकार ऑडिओ क्लिप व्हायरल*

हा प्रकार घडल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आम्ही त्याची बाजू मांडण्याचे ठरवले. तसेच संबंधित शेतकरी हा पोलीस ठाणे तसेच जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे यासंदर्भात आपले गाऱ्हाणे मांडणार असल्याबाबत त्याने सांगितले आहे. तरी प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलच. पण अशा प्रकारच्या मुजोर टोळी चालकांना व होत असलेल्या शेतकऱ्यांची लूट थांबवणे गरजेचे असून यावर प्रशासनाने लवकरच कारवाई करावी अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!