E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे चरित्रग्रंथाचे प्रकाशन 

केम – करमाळा समाचार 

येथील श्री उत्तरेश्वर ज्यु. कॉलेज केम मधील प्रा.डॉ. मच्छिन्द्र नागरे लिखित संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे या चरित्रग्रंथाचे प्रकाशन मोठया उत्साहात पार पडले. संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कोल्हापूर येथील शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पवित्र समाधी परिसरात या चरित्र ग्रंथाचे विमोचन कार्याध्यक्ष प्राचार्य श्री अभयकुमारजी साळुंखे , सचिवा प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे , प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ. युवराज भोसले,अर्थ सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ , मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, मा.प्राचार्य डॉ.अशोकराव जगताप, प्रा. डॉ. महेश गायकवाड यांच्या शुभहस्ते या ग्रंथ प्रकाशनाचा समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला.


यावेळी प्रारंभी परमपूज्य बापूजी आणि संस्थामाता यांच्या समाधीचे पूजन करण्यात आले. यानंतर लेखक प्रा.डॉ. मच्छिन्द्र नागरे यांनी या ग्रंथ लेखनामागील भूमिका विषद केली. या चरित्रग्रंथात संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या अनेक ज्ञात – अज्ञात पैलूवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 1942 चा स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, विवेकानंद शिक्षण संस्था पर्व प्रमुख साक्षीदार, बापूजीना खंबीर साथ, बापूजी नंतर संस्थामाता पर्व, आधारवड म्हणून खंबीर पाठबळ, गुरुदेव कार्यकर्त्यांच्या आठवणीतील संस्थामाता असे अनेक प्रसंग अधोरेखित केले आहेत.

यावेळी कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी संस्थामाता सुशीलादेवी यांच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला व या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. सचिवा प्राचार्या सौ.शुभांगीताई गावडे यांनी या चरित्रग्रंथ लेखनास शुभेच्छा देऊन संस्थामाताना अभिवादन केले. या प्रकाशन कार्यक्रमास श्री अजित मोहिते, प्रा.शिल्पा भोसले, प्रा.गीतांजली साळुंखे, प्रा.सुनील शिंदे, मा. प्राचार्य प्रतापराव देशमुख, प्रा. वाघ सर, प्रा. एस.के.पाटील व इतर गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE