नवरात्रीनिमित्त सांस्कृतिक शोभायात्रा संपन्न ; सांस्कृतिक शोभायात्रेत सहभागी झालेला विद्यार्थी वर्ग
केत्तूर (अभय माने)
नवरात्र हा सर्जनाचा असून स्त्रियांच्या सर्जनशीलतेचा सन्मान असल्याचे प्रतिपादन नेताजी सुभाष महाविद्यालयाचे प्राचार्य काशिनाथ जाधव यांनी केले.यावेळी पर्यवेक्षक भीमराव बुरुटे उपस्थित होते.
नवरात्र उत्सवानिमित्त नवव्या दिवशी केत्तूर (ता.करमाळा) येथे मुख्य मार्गावरून विद्यार्थ्यांची संस्कृतिक शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी विद्यार्थिनी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक गीतांच्या तालावर ठेका धरला तसेच पारंपरिक नृत्याचा आनंदही लुटला.यापैकी दांडिया नृत्य आकर्षणाचे केंद्र ठरले.यावेळी भारतीय संस्कृती संस्कृतीतील मूल्य त्यांची जपवणूक संस्कृतीरक्षणार्थ आवश्यक असल्याचे मत प्रा.किशोर जाधवर यांनी व्यक्त केले.
यावेळी माधुरी वळवी,शोभा समुद्र,प्रियंका साळी,लता भोसले,अश्विनी पवार यांचेसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र मदने यांनी केली तर आभार वणत्या कडवे यांनी मानले.ग्रामस्थांनी या शोभा यात्रेचे मन भरून कौतुक केले.व सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत असल्याबद्दल प्रशालेचे व शिक्षकवर्गाचे अभिनंदन केले.