…या योजनेतील प्रलंबित अनुदानासाठी आमदार संजयमामा शिंदे यांचे मंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी – करमाळा समाचार
सोलापूर जिल्ह्यातील शासनाच्या’ मागेल त्याला शेततळे’ या योजनेतील करमाळा तालुक्यातील ११० प्रस्तावांसह सोलापूर जिल्ह्यातीत एकूण ३३७४ शेततळ्यांचे प्रस्तावाचे प्रलंबित थकीत असलेले एकूण १६ कोटी रुपये अनुदान त्वरीत मिळावे अशी मागणी करमाळ्याचे आ .संजयमामा शिंदे यांनी राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांची मुंबई येथे भेट घेवून चर्चा करून लेखी निवेदनाव्दारे केली आहे .

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे शेततळ्याचे थकीत अनुदान त्वरीत मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी मागणी आ .शिंदे यांनी केल्यामुळे जलसंधारणमंत्री ना . गडाख यांनी सचिवांनी तात्काळ कार्यवाही करणे बाबतचे आदेश दिले .
करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतक ऱ्यांच्या बाबतीत अडचणीच्या व योग्यवेळी मदतीचा दिलासा देण्याचे दृष्टीने आ . संजयमामा शिंदे हे समयसूचकता पाहून पार पडत असलेली त्यांची जबाबदारी व कर्तव्यनिष्ठा वाखाणण्याजोगी आहे.

– माजी आमदार जयवंतराव जगताप.