E-Paperकरमाळाकृषीताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

महाआघाडीत बिघाडी ? – राष्ट्रवादीचे कर्जतचे आमदार रोहित पवारांकडे अदिनाथची सुत्र देण्यास शिवसेनेचा विरोध

आदिनाथ साखर कारखाना सत्तेचा गैरवापर करून कुणी गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणार असेल तर शिवसेना मोठ्या ताकतीने रस्त्यावर उतरून त्याला विरोध करेल असा इशाराही शेवटी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला आहे. रोहित दादांना कारखाना विकत घ्यायचं असेल तर त्यांनी मकाई साखर कारखाना विकत घ्यावा आदिनाथ ही करमाळा तालुक्याची अस्मिता आहे त्याला धक्का लावू नये असा इशारा दिल्याने महाआघाडीत बिघाडीला करमाळ्यातुन सुरुवात होतेय का ?असा प्रश्न पडत आहे.

प्रतिनिधी सुनिल भोसले

 

करमाळा तालुक्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार संजयमामा शिंदे यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना स्वतः पाच वर्षे चालविण्यास घेऊन पुन्हा तो सहकार तत्वावर करमाळा तालुक्यातील सभासदांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्याची अस्मिता आहे. हा कारखाना काही नेतेमंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी बारामतीच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न चालू केला आहे. एकदा हा कारखाना बारामती ॲग्रो म्हणजे आमदार रोहित दादा पवार यांच्या ताब्यात गेला तर तो त्यांची काही दिवसात खाजगी मालमत्ता होईल पूर्व इतिहास पाहता कन्नड साखर कारखाना कशा पद्धतीने नेत्यांनी गिळंकृत केला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याचा डिसलरी प्रकल्प बारामती ॲग्रो कारखान्याने भाडेकराराने घेतला असून मकाई कारखान्याला सत्तर कोटी रुपयांची आर्थिक मदत बँकेच्या माध्यमातून करायची या तडजोडीतून रश्मी बागल व विलासराव घुमरे यांनी मिळून सुभाष गुळवे यांच्या मध्यस्थीने आदिनाथ कारखाना अप्रत्यक्षपणे रोहित पवारांना विकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यात मोठा आर्थिक गैरव्यवहार होण्याचे झाल्याची शक्यता आहे असा दावा चिवटे यांनी केला आहे.

पुढे बोलताना चिवटे म्हणाले , आदिनाथ कारखान्यावर केवळ 128 कोटी रुपये कर्ज आहे. त्यात 90 कोटी रुपयांची साखर शिल्लक आहे. कारखान्याची 258 एकर जमीन आहे. जंगम मालमत्ता तीनशे कोटी रुपये आहे अशी सक्षम परिस्थिती असताना केवळ आपला राजकारणातून जनतेने पराभव केला. याचा राग मनात धरून बागल कुटुंबीयांनी हा कारखाना रोहित दादा पवार यांना विकण्याचा घाट घातला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यावर पाचशे कोटी रुपयांपेक्षा जादाची कर्ज आहे याची सर्व माहिती असताना त्या कारखान्याला शासन थकबाकी हमी देते मात्र आदिनाथ चा लिलाव काढायची एवढी महाराष्ट्र शासनाला काय घाई झाली आहे? मकाईला मदत करा आम्ही तुम्हाला आदिनाथ कारखाना विकत देतो अशा पद्धतीचा गुप्त व्यवहार रोहित पवार व बागल कुटुंबीय यांच्यात झालेला आहे. हा व्यवहार करमाळा तालुक्यातील जनता कदापि मान्य करणार नाही. जनतेच्या वतीने आम्ही रोहित दादांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात तुमची अनेक उद्योग आहेत तुम्ही आदिनाथ मध्ये लक्ष घालू नका आणि समाजहितासाठी लक्ष घालायचे असेल तर पाच वर्षासाठी तुम्ही चालवा व पुन्हा सभासदांच्या ताब्यात द्या.

करमाळा तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून संजय मामा शिंदे यांची जबाबदारी आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे. त्यांच्याकडे साखर कारखाना चालवण्याची ची ताकद आहे. त्यांनी पुढाकार घेऊन दोन-तीन वर्ष हा साखर कारखाना चालवावा व पुन्हा सभासदांच्या ताब्यात ताब्यात देऊन आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला सामोरे जावे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE