धक्कादायक बातमी – वनविभागाच्या कचाट्यातुन बिबट्याचे पलायन ; या दिशेने बिबट्या पसार
करमाळा समाचार
सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात चिकलठाण येथील ऊसतोड कामगाराची मुलगी ठार झाल्यानंतर दुपारी बारा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. पण बिबट्या मिळून येत नव्हता. अखेर उसाच्या फडाला आग लावण्याचे ठरवले. फडाला आग लावताच बिबट्याने शेजारी असलेल्या केळीच्या बागेतून धूम ठोकली व पसार झाला. त्यामुळे दिवसभर वन विभाग व सर्व यंत्रणांनी काम केले ते सर्व निष्फळ ठरले आहे. तर पुन्हा एकदा बिबट्याची सावट पुढील गावातील ग्रामस्थावर राहणार आहे.

आता बिबट्या पहिल्यापेक्षा अधिक भयानक रूप दाखवणार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चिखलठाण परिसरातील जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील प्रत्येक गावातील लोकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. शक्यतो हा बिबट्या शेटफळ भागाच्या दिशेने पुढे गेला असून परिसरातील सर्व नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

कारण सकाळी हल्ला केल्यानंतर स्थानिक ऊसतोड मजुरांनी त्याला हुसकावून लावले, तर त्यानंतर दिवसभर सर्व यंत्रणा त्याच्या मागे लागली होती अशा वेळी तो भुकेला ही आहे भेदरलेला आहे. अशा परिस्थितीत तो त्या ठिकाणाहून पळून गेला आहे. त्यामुळे चिकलठाण परिसरातील जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील प्रत्येक गावातील लोकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. शक्यतो हा बिबट्या शेटफळ भागाच्या दिशेने पुढे गेला असून परिसरातील सर्व नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. तपास अधिकारी अजुनही त्याच्या मागावर आहेत.