आमदार रोहित पवारांची करमाळ्यात तीन तास पाहणी ; बिबट्या सांगवीच्या शेतात
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात तीन जणांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्या ने आज दुपारी दोनच्या सुमारास नरसोबावाडी सांगवी क्रमांक तीन येथील शेतात काम करणाऱ्या पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्यापूर्वीच दगडफेकीमुळे बिबट्याने पलायन केले. पण बिबट्या शेजारच्या शेतात जाऊन बसल्याने अद्यापही त्याचा शोध घेतला जात आहे तर वांगी व सांगवी परिसरात कर्जतचे आमदार रोहित पवार यांनीही भेट दिली व परिस्थीती समजुन घेतली. तर उद्या पालकमंत्री अंजनडोह येथे येणार आहेत.

नंतर तो बिबट्या कदम यांच्या केळीच्या शेतात गेला दुपारी तीन वाजल्या नंतर ही बातमी वन विभाग अधिकाऱ्यांना त्यांना कळल्यानंतर व सत्तर-ऐंशी कर्मचाऱ्यांनी या उसाच्या व केळीच्या पाच एकराच्या परिसरात घेराव घातला आहे. शार्प शूटर सायंकाळी सहाच्या पुढे उसाच्या फडात घुसले. रात्री 9 वाजेपर्यंत विभागाने प्रयत्न करून त्याला जेरबंद करण्याच नियोजन केले. पण त्यांना अजुनही आकारा वाजले तरी यश आले नाही.
आमदार रोहित दादा पवार यांची भेट…

आमदार रोहित दादा पवार यांनी आज सायंकाळी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी उपस्थित वन विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. कसल्याही परिस्थितीत बिबट्याच्या संकट करमाळा तालुक्या वरून टाळण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राणाची शिकस्त करून हा बिबट्या जेरबंद करावा अशा सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत बारामती ऍग्रो चे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे उपस्थित होते. वनविभागाचे अधिकारी गेल्या पाच दिवसापासून ज्या पद्धतीने काम करत आहे त्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी समाधान व्यक्त केले. तर त्यांनी स्वतः हातात दांडके घेऊन तब्बल तीन तास गस्त घातली.