करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

वाळु उपश्यावर कारवाई – तीन परप्रांतीयांसह ६६ लाखाचा मुद्देमाल ताब्यात – इंदापूरचे तीन फरार

करमाळा – विशाल घोलप

तालुक्यातील उजनी जलाशयात वाळू उपसा करीत असताना महसुल, सोलापूर पोलिस तसेच करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कामगिरी करत तिघांसह ६६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचा प्रकार गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ढोकरी ता. करमाळा येथील नदीपात्रात घडला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रईउल शेख (वय ३२), आमिर शेख (वय २४), युसुफ शेख (वय ३५) सर्व रा. जिल्हा साहेबगंज राज्य झारखंड असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींचे नाव आहेत तर इंदापुर तालुक्यातील पप्पु सल्ले, विकास देवकर व युवराज फलफले आदि फरार आहेत अशी माहीती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहीती अशी की, ढोकरी येथे नदीपात्रात वाळू उपसा होत असल्याबाबत सोलापूर येथील पथकाला माहिती मिळाल्यानंतर सोलापूर एलसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या पथकाने करमाळा येथील महसूल व पोलीस प्रशासनास सोबत घेऊन सदरची कारवाई केली. पहाटे साडेपाचच्या सुमारास उजनी जलाशयामध्ये दोन बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करीत असताना संबंधित परप्रांतीय मजूर मिळुनआले आहेत. तर इंदापूर तालुक्यातील तिघे पळून गेले आहेत. पकडलेल्या परप्रांतीयांकडुन माहिती विचारल्यानंतर संबंधित तिघांची नावे समोर आली.

तर संबंधितांकडून दोन यांत्रिक बोटी, एक सेक्शन पाईप, २१ ब्रास वाळू असा एकूण ६६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. या कारवाईमध्ये तहसीलदार शिल्पा ठोकडे व पोलीस निरीक्षक विनोद घुगे सहभागी झाले होते. यातील पकडलेल्या तिघांना न्यायालयात उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे. फरार तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे हे करीत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE