करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

पुन्हा हुलकावणी – बिटरगाव पासुन दोन किमींच्या परिसरात सावधानतेचा इशारा ; आजच्या मोहिमेत नाट्यमय घडामोडी

करमाळा समाचार 

नरभक्षक बिबट्या चा शोध घेण्यासाठी वन विभागात सह संपूर्ण बिटरगाव व परिसरातील गावातील नागरिक आज मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत असतानाही बिबट्याने पुन्हा एकदा चकवा देत शेजारच्या रानातून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने मोहीम हाती घेत परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बिटरगाव वांगी येथे दुपारी साडेचार वाजले पासून बिबट्या पकडण्यासाठी मोहीम राबवण्यात येत होती. यावेळी बिबट्या उसाच्या शेतात गेल्यानंतर त्याठिकाणी डॉग स्कॉड च्या साह्याने शोध घेण्याचे काम सुरू झाले होते. यावेळी बिबट्याने शेतातून धूम ठोकली. पळून जात असताना उपस्थित असलेले शार्प शूटर यांनी त्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. गोळीबारही केला पण तीन गोळ्या चकवत बिबट्या हा शेजारच्या दुसऱ्या केळीच्या शेतात घुसला त्यानंतर त्यानंतर बराच वेळ शोधाशोध केली.

वैदू समाजाच्या काही लोकांना बिबट्याच्या शोधासाठी ही बोलण्यात आले होते. सोबत त्यांच्याकडे असलेले कुत्रे घेऊन शेतात शोधाशोध करत होते. यावेळी मोठ्या धाडसाने त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. पण उशिराने अंधार पडल्यानंतर त्यांना ही बाहेर काढण्यात आले व डॉग स्कॉड च्या मदतीने तसेच स्थानिकांच्या मदतीने वनविभाग बिबट्याचा माग काढत होते. पण जवळपास रात्री अकराच्या सुमारास बिबट्याने शेजारच्या उसाच्या शेतातून पुन्हा एकदा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे आसपासच्या तीन ते चार किलोमीटर अंतराच्या परिसरात पुन्हा बिबट्या पासून धोका निर्माण झाला आहे. आसपासच्या सर्व गावांनी सावध राहण्याची गरज आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE