नाहक प्रतिष्ठेसाठी वेळ व पैसा वाया घालवण्याऐवजी … – साळुंके
करमाळा समाचार
नाहक प्रतिष्ठेसाठी वेळ व पैसा वाया घालवण्या ऐवजी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे येऊन निवडणूक लागलेल्या जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात असे आवाहन भाजपा चे युवा नेते अमरजित साळुंके यांनी केले आहे.

पुढे बोलताना श्री साळुंके म्हणाले की कोरोनाच्या पर्शवभूमीवर निवडणूक बिनविरोध होणे गावासाठी गरजेचे व चांगले आहे. सामाजीक कामांची आवड असणाऱ्या, गावासाठी व समाजासाठी वेळ देऊ शकणाऱ्या होतकरू व्यक्तींना गटा तटाचे राजकारण बाजूला ठेवून सदस्य बनण्याची संधी गावकऱ्यांनी द्यावी.

गावचा विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे, त्यामुळे गावाची एकी मजबूत होऊ शकते.त्यामुळे गावागावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणा दाखवून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहभाग घेतला पाहिजे, असेही साळुंके यांनी म्हटले आहे.